Breaking News
Home / जरा हटके / ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला निरोप देताना कीर्ती झाली भावुक

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला निरोप देताना कीर्ती झाली भावुक

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ५ डिसेंबर पासून जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाहची ‘ फुलाला सुगंध मातीचा ‘ या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. मालिकेतील कीर्ती, शुभम ची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे समजल्यावर या मालिकेच्या प्रेक्षकांनी ही मालिका चालू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र सततच्या ट्विस्टला कंटाळून मालिकेने कुठेतरी थांबणं हाच पर्याय योग्य असतो असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या आठवड्यात मालिकेचे कायमचे पॅकअप करण्यात आले. खरं तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी एक भूमिका यावी वाटते जिच्यामुळे त्यांना ओळख मिळते.

phulala sugandh maticha kirti
phulala sugandh maticha kirti

कीर्तीच्या भूमिकेने अभिनेत्री समृद्धी केळकर ला अशीच एक ओळख मिळवून दिली आहे. कीर्ती जामखेडकर च्या भूमिकेला अनेक छटा होत्या. या भूमिकेमुळे मला वेगवेगळी आव्हानं स्वीकारण्याची संधी दिली असे समृद्धी म्हणते. मात्र आता या भूमिकेतून आपल्याला बाजूला व्हायचंय हे सत्य पचवणं प्रत्येक कलाकाराला जड जातं. समृद्धीला देखील हे सत्य जड अंतकरणाने स्वीकारावं लागलं आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जात आहे त्यामुळे कीर्तीच्या भूमिकेला निरोप देताना समृद्धी भावुक झालेली आहे. किर्तीला शेवटचा निरोप देताना अभिनेत्रो अभिनेत्री समृद्धी केळकर म्हणते की, ‘किर्ती.. कला , अभिनय क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं हे विविधरंगी पात्र..विविधरंगी याचसाठी म्हटलं कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत , होते. सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी , समंजस , घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजून सांभाळून घेणारी , नाती जपणारी,स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी.. मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी.. स्वतःचं स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी , स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी ही कीर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं.

actress samrudhdhi kelkar photo
actress samrudhdhi kelkar photo

romantic sequence तर मालिकांमधे करायला मिळतातच पण कीर्ती IPS officer असल्यामुळे मालिकेतल्या एका टिपीकल सूनेचं काम करता करता फायटिंग सिक्वेन्स , वेगवेगळ्या physical activities , military training , अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला ,करायला मिळाल्या. व्यावसायिक आयुष्यात तर मला किर्तीने खूपपपपपप दिलंच आहे. पण वैयक्तिक आयुष्यात पण मला तिनं अजाणतेपणी बरंच शिकवलं आहे. कीर्तीचं आत्मविश्वासाने मुद्दे मांडणं , वेगवेळ्या लोकांना त्यांच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सांभाळून घेणं आणि अवखळ असून देखील वेळ आली की संयमानं वागणं हे मी समृद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आत्मसात करण्याचा , तसं वागण्याचा प्रयत्न करत आहेच. किर्ती मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस ,आहेस आणि कायम राहशील. Thank you kirti

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *