मराठी तडका

पवित्र रिश्ता च्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी

झी वाहिनीवरील “पवित्र रिश्ता” ही हिंदी मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. १ जून २००९ साली पहिला भाग प्रदर्शित झालेली ही मालिका २०१४ सालापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. कालांतराने मालिकेच्या कलाकारांमध्ये अनेक बदल करण्यात आले मात्र सुरुवातीला सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, किशोर महाबोले, प्रार्थना बेहेरे अशी भली मोठी मराठमोळी कलाकार मंडळी या मालिकेत झळकल्याने अन्य राज्यांइतकीच महाराष्ट्रातही ही हिंदी मालिका प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली होती.

pavitra rishta actress usha nadkarni
pavitra rishta actress usha nadkarni

मानव आणि अर्चना यांची प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. अर्चनावर सासुरवास करणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी सविताताईंची भूमिका आपल्या अभिनयाने चोख बजावलेली दिसली. सुशांत सिंग राजपूत च्या जाण्याने त्याची आठवण म्हणून या मालिकेचा सिकवल यावा अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीवर नुकताच विचार करण्यात आला असून “पवित्र रिश्ता 2.0” भेटीस येत असल्याचे सांगण्यात येत आहे शिवाय मालिकेच्या कलाकारांवरही शिक्कामोर्तब केला असल्याचे समोर आले आहे. अर्चनाची भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सुशांतची कमी कायम राहील हे मात्र उघड उघड आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या देखील या मालिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. उषा नाडकर्णी यांनी आपल्या वयाची ७७ री ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले आहे.

actress usha nadkarni
actress usha nadkarni

उषा नाडकर्णी या डायबिटीज पेशंट आहेत त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिकाच करत नसल्याचे जाहीर केले आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखील सध्याच्या कठीण काळात त्यांना काम करण्यास मनाई केली आहे. उषा नाडकर्णी या मराठी सृष्टीतील खाष्ट सासू म्हणून चांगल्याच परिचयाच्या आहेत. आजवर त्यांनी आपल्या अभिनयातून उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी सृष्टीतही पवित्र रिश्ता मालिकेतून त्या सासूच्या भूमिकेचा दबदबा टिकवून ठेवताना दिसल्या होत्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी मालिकेत काम करत नसल्याचा घेतलेला हा निर्णय योग्यच आहे अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. येत्या काळात या मालिकेच्या अन्य कलाकारांबाबतही लवकरच उलगडा होईल त्याबाबत वेळोवेळी अपडेट करत राहूच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button