
आपल्या आयुष्यात अनेक माणसं असतात जी जात येत असतात. पण एकच माणूस क्लिक होतो आणि त्याच्यासोबत आपण आयुष्य आनंदात घालवू शकतो असं वाटतं तोच खरा जोडीदार. पावनखिंड मधील रुस्तमेजमान फेम ऋषी सक्सेना यालाही त्याची जोडीदार अशीच सापडली. चला हवा येऊ द्या शो च्या मंचावर इशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटले आणि चला-हवा-येऊ-द्या म्हणता म्हणता म्हणता चला प्रपोज करूया असं म्हणत दोघांनी एकमेकांना पसंत केलं. सध्या ही जोडी एकमेकांना डेट करतेय आणि रोमँटीक फोटोही शेअर करते. पावनखिंड या सध्या गाजत असलेल्या सिनेमात ऋषीने तगडा अभिनय केला आहे. या सिनेमात रुस्तमेजमान ही त्याची भूमिका गाजत आहे तर ईशा सध्या काही वेब सिरीजमध्ये काम करत आहे .

चला हवा येऊ द्या या शोचा भागांमध्ये इशा केसकर आणि ऋषी सक्सेना सहभागी झाले होते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात येईपर्यंत दोघांची काहीच ओळख नव्हती. फक्त एका वाहिनी वरच्या दोन मालिकांमध्ये काम करणारे कलाकार म्हणून ते एका मंचावर एकत्र आले . खरंतर ऋषी सक्सेना हा हिंदी भाषिक आहे. काहे दिया परदेस या मालिकेच्या कथेला अनुरूप हिंदी भाषिक हिरो असल्याने ऋषी सक्सेनाचा मराठी मालिकेच्या वर्तुळात प्रवेश झाला. ईशा सांगते ‘ चला हवा येऊ द्या या शोच्या वेळी गप्पा मारताना त्याचा स्वभाव ईशाला खूप आवडला. तो जरी हिंदी भाषिक असला तरी मराठी जाणून घेण्याची, मराठी भाषेतील अर्थ समजून घेण्याची त्याला फार आवड होती. त्यातूनच या दोघांचा संवाद सुरू झाला. त्याने काही मराठी शब्दांचे अर्थ मला त्यावेळी विचारले होते. आमचा संवाद वाढत गेला आणि मग आमची मैत्री झाली. एकमेकांचे मित्र असताना आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यातूनच आपण एकत्र आयुष्य छानपणे जगू शकतो असे.आम्हाला दोघांनाही वाटलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम म्हणजेच आमच्या दोघांसाठी एकत्र येण्याचं कारण आहे. गेली चार वर्षापासून ईशा आणि ऋषी एकमेकांना डेट करत आहेत. खरे तर अनेकदा असं होतं की, कलाकार एकमेकांना डेट करत असतात तेव्हा त्याविषयी जाहीरपणे बोलण्याचे टाळतात. मात्र या दोघांनीही आपलं रिलेशन कधीच नाकारले नाही. त्या दोघांच्या सोशल मीडिया पेजवर त्यांचे एकत्रित फोटो दोघंही शेअर करत असतात.

सहाजिकच आता हे नक्की आहे की ईशा आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. पण दोघांच्या हातात वेगवेगळे प्रोजेक्ट असल्यामुळे सध्यातरी दोघांच्या लग्नाचा विचार नाही. इशा केसकरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वुई आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तीची मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री झाली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ची भूमिका करणारी रसिका सुनील तिच्या अभिनय प्रशिक्षणासाठी लंडनला गेली त्यानंतर शनाया हा रोल तिच्याकडे चालून आला. जय मल्हार मालिकेतील बानू आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही अत्यंत मॉडर्न मुलगी यांनी ईशाचा फॅनक्लब वाढला. गर्लफ्रेंड या सिनेमातही शनाया च्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. सध्या काही वेबसीरिज आणि जाहिरातीमध्ये इशा बिझी आहे तर ऋषी सक्सेना याने काहे दिया परदेस या मालिकेतून मराठीत एन्ट्री घेतली . तसेच त्याचं हिंदी मध्ये जोरात काम सुरू आहे. सध्या तरी या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित नसली तरी एकमेकांसोबत सहवासातला आनंद मात्र ईशा आणि ऋषी मनमुराद घेत आहेत.