संपूर्ण अभिनय तसेच राजकीय विश्वात खळबळ पसरविणारी एक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याला भर रस्त्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. सिद्धूने आजवर त्याच्या आवाजाने मोठा चाहता वर्ग गोळा केला होता. अशात नवज्योत सिंग सिद्धू बरोबर त्याची चांगली मैत्री होती. हे दोघे अनेकदा एकमेकांना भेटायचे. त्यामुळेच सिद्धूला काँग्रेसमध्ये घेण्यात आले. अशात पक्षात आल्यानंतर त्याने विधानसभेची एक निवडणूक देखील लढवली. मात्र निवडणुकीत तो अयशस्वी ठरला.

२९ मे रोजी तो पंजाबमधील एका गावातून आपल्या चारचाकी गाडीने चालला होता. त्याचवेळी काही भामट्यांनी त्याच्या गाडीला घेरलं आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं होतं. मात्र गोळीबार होण्याच्या एक दिवस आधी त्याची ही सुरक्षा काढून घेण्यात आली होती. आणि नंतर लगेचच त्याच्यावर असा गोळीबार झाला. या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी तसेच त्याचे पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्यामागे खरं कारण काय होते असा सवाल सिद्धूचे कुटुंबीय करत आहेत. सिद्धूने आजवर अनेक रॅप साँग गायले आहेत. त्याच्या गाण्यांमुळेच तो खूप प्रसिद्धी झोतात आला होता. निधनानंतर आता त्याचे चाहते तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. सिद्धूचे वडील माजी सैन्यदलाचे अधिकारी आहेत. तर आई त्याच्या गावची सरपंच आहे. मुलाच्या निधनाने दोघेही पूर्णतः खचून घेले आहेत. नव्या सरकारने अंगरक्षक काढून घेताच दुसऱ्याच दिवशी हा झालेला मोठा घात आहे त्यामुळे सरकार ह्याला जबाबदार असल्याचं देखील बोललं जातंय.