महाराष्ट्रीयन कुटुंबात विवाह सोहळा म्हटल की, प्रत्येक घरात कामांची लगबग दिसते. कुटुंबात एक वेगळंच आनंदाचं आणि उत्साहाच वातावरण असतं. अशातच विवाह सोहळा पार पडण्यापूर्वी प्रत्येक मराठी कुटुंबात केळवणाचा कार्यक्रम होतच असतो. अशातच मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रसिद्ध गायिकेचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताय. महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका अबोली गिऱ्हे हिचा नुकताच केळवणाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या अबोली गिऱ्हेचा केलवनाचा कार्यक्रम जोरदार पार पडला आहे. या कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल रंगाचा कुर्ता परिधान करून केलवणाच्या कार्यक्रमातील बेताचा आनंद घेताना दिसून येत आहे. या कार्यक्रमात चविष्ट पदार्थांचा बेत पाहायला मिळाला होता. यावेळी तिचे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर प्री वेडिंग शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आदित्य कुडतडकर सोबत असल्याचे दिसून येत आहे. आदित्य कुडतडकर बद्दल बोलायचं झालं तर तो एक प्रसिध्द म्युसिशियन आहे. तसेच अबोली गिऱ्हे बद्दल बोलायचं झालं तर तिने स्वामी समर्थ स्तुती, रंगलया आणि येशील तू अशी गाणी गायली आहेत. तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या पांडू या चित्रपटात तिने पार्श्वगायन केलं. तर फुलपाखरू आणि काहे दिया परदेस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचे शीर्षक गीत देखील तिने गायले आहे.

नुकतंच नूतनवर्षाच्या शुभेच्छा देतानाची तिची पोस्ट देखील खूप विरळ झाली होती त्यात ती लिहते ” 2021 संपण्या आधी तुम्हां सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद देऊ इच्छिते ! तुम्ही आता पर्यंत जे सहकार्य व प्रेम केलं ते असच पुढे पण करत रहाल ही आशा करते. कारण तुमची साथ माझ्या साठी लाख मोलाची आहे.” पांडू चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच तिला चला हवा येउद्या च्या मंचावर येण्याचं भाग्य लाभलं असं ती म्हणते. तिथे तिने गायलेलं गाणं कलाकारांसोबत प्रेक्षकांना खूपच आवडलं. यापूर्वी देखील अनेक स्टेज शो आणि झी वाहिनीच्या प्रोग्रॅम मध्ये तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिच्या आवाजातील गोडवा प्रेक्षकांना मेहमीच आवडताना दिसतो. युट्यूब वर देखील तिचा चायनाला पाहायला मिळतो त्यात माझा होशील ना, तुझ्यात जीव रंगला, खुलत कळी खुलेना, माझिया प्रियेला प्रीत कळेना अश्या झी मराठी मालिकांच्या शीर्षक गीत गातानाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जुलै २०२१ मध्ये तिने साखरपुडा उरकला होता आता लवकरच ती विवाह बंधनात अडकणार असल्याचं दिसून येतंय. आदित्य कुडतडकर आणि अबोली गिऱ्हे खूप खूप शुभेच्छा..