Breaking News
Home / जरा हटके / “धरिला पंढरीचा चोर…” गाण्यातील हि अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे? आजही दिसतात खूपच सुंदर

“धरिला पंढरीचा चोर…” गाण्यातील हि अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे? आजही दिसतात खूपच सुंदर

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन आज २० वर्ष उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील विठोबा साऱ्यांच्याच कायम स्मरणात राहणार एवढे मात्र खरे आणि तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. आजच्या लेखात आपण चित्रपटातील ‘नंदिनी जोग’ या अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत…

actress nandita jog
actress nandita jog

त्यांनी या चित्रपटातून जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या मुलीची म्हणजेच ‘मुक्ताची’ भूमिका साकारली होती. अभिनेत्री नंदिनी जोग या मराठी चित्रपट सृष्टीतील सहाय्यक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. पंढरीची वारी या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी कळत नकळत, वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधकडक अशा चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ, विजय कदम अशा मातब्बर कलाकारांसोबत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. नंदिनी जोग या मूळच्या अकोल्याच्या परंतु लग्न करून पुण्यातच त्या स्थायिक झाल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित जोग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अभिजित जोग यांनी पुण्यात ‘प्रतिसाद ऍडव्हरटायझिंग’ नावाने एजन्सी उभारली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते ऍडव्हरटायझिंग तसेच ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याच क्षेत्राशी निगडित असलेले “ब्रँडनामा” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. तर त्यांचा मुलगा ‘अनिश जोग’ हाही मराठी चित्रपट क्षेत्राशी निगडित असलेला पाहायला मिळतो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *