पाहिले न मी तुला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतला समर प्रताप जहागीरदार आता एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मानसीला मिळवण्यासाठी समरचा हा डाव नेमका आहे तरी काय ? किंवा तो हे सर्व कशासाठी करतोय याचा उलगडा लवकरच होणार आहे. समर जहागीरदार हा पूर्वाश्रमीचा “विजय धावडे” आहे का? किंवा विजय धावडे आणि मानसीच्या कुटुंबाचे काही पूर्वीचे कनेक्शन आहे का याबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. याबाबत लवकरच उलगडा होईल मात्र मालिकेत आणखी एक नवे पात्र दाखल होत आहे.

संगीचे हे पात्र समीरची पत्नी म्हणजेच विजय धावडेची पत्नी दर्शवली आहे. आज हे पात्र साकारणाऱ्या नवख्या नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… पाहिले न मी तुला मालिकेत समरची अर्थात विजयच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे “तेजश्री मुळे”. तेजश्री मुळे ही उत्कृष्ट नृत्यांगना असून नाट्य, मालिका अभिनेत्री तसेच लेखिका सुद्धा आहे. रामनिवास रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे इथेच अभिनयाचे वेध तिला लागले. “नालंदा डान्स रिसर्च सेंटर नालंदा नृत्य कला” महाविद्यालयातून तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती अनेक मोठमोठ्या मंचावर आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसते. महेश कोठारे यांच्या विठू माऊली या लोकप्रिय मालिकेतून तिने महत्वाची भूमिका साकारली होती. ही तिने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका ठरली. याशिवाय अनोळखी, अ कॉन्व्हरसेशन, द सेकंड सेक्स, खिडकी अशा चित्रपट नाटकांतून तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. “मिस ठाणे-१८ ” च्या सौंदर्य स्पर्धेत तिने पार्टीसिपेट केले होते त्या स्पर्धेत “मिस बेस्ट पोज” हा किताब तिने पटकावला होता.

विठू माऊली मालिकेनंतर आता झी वाहिनीच्या पाहिले न मी तुला या मालिकेत ती समरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. समर प्रमाणेच तिचे हे पात्र देखील विरोधी भूमिका दर्शवणार का? किंवा ती मानसी आणि अनिकेतला साथ देईल का? याबाबत उत्सुकता निर्माण होत आहे. येत्या काही दिवसातच तिच्या या भूमिकेबाबत स्पष्ट होईलच . शिवाय संगी आणि विजय दोघे मिळून मानसी आणि तिच्या कुटुंबाविरोधात कुठला डाव तर रचणार नाहीत ना ? याबाबतही लवकरच उलगडा होईल. याआधीही मालिकांमध्ये तिचा दमदार अभिनय दिसून आला ह्याही मालिकेत ती उत्कृष्ठ अभिनय करून सारकांची माने जिंकेल हे वेगळं सांगायला नको. अभिनेत्री तेजश्री मुळे हि सोशिअल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते तिथे तिचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुर्तास पाहिले न मी तुला या मालिकेसाठी अभिनेत्री तेजश्री मुळे हिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…