स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहिनीचा टीआरपी देखील वाढण्यास मदत झाली आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेसोबतच सांग तू आहेस का? या नव्याने येऊ घातलेल्या मालिकेला देखील प्रेक्षकांडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज …
Read More »म्हणून चाहते भेटायला आल्यावर कमीतकमी विचारा…अज्याची भूमिका साकारणाऱ्या नितीशने खंत केली व्यक्त
लागींर झालं जी मालिकेतून अजिंक्य आणि शितलची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. विशेष म्हणजे नितीश चव्हाणने साकारलेला फौजी( अजिंक्य) प्रेक्षकांना खूपच भावला. याच भूमिकेमुळे नितीश अनेक तरुणींना भुरळ घालू लागला. अगदी मालिका सुरू असताना देखील सेटवर आपल्या या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते गर्दी करू लागत असत. मालिकेने प्रेक्षकांचा …
Read More »एकेकाळी दारोदार हिंडून विकायचा साड्या लोकं तोंडावर खाडकन दारं बंद करायचे, अपमान करायचे…आज आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा
आजकाल अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात येण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाहीत असे म्हटले जाते. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा (अन्य पर्यायी माध्यमं) युट्युबवर आपल्या कलेचा एखादा व्हिडीओ अपलोड करून ती प्रसिद्धी मिळवणे सहज शक्य झाले आहे. परंतु ही माध्यमं उपलब्ध होण्याअगोदर मात्र अशा कलाकारांना अपार मेहनतीशिवाय पर्याय नसायचा …
Read More »अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे दुःखद निधन
अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्गबाई सासूबाई मालिका करताना सेटवरही ते क्वचितच दिसायचे. पण त्यांनी मालिकेत केलेलं काम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हेही तितकंच खरं. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा म्हणजेच दत्तात्रय कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते “रवी पटवर्धन” यांनी. आज …
Read More »मैत्रीमध्ये काहीही म्हणत मराठी सृष्टीतील या नावाजलेल्या अभिनेत्रींनी डोक्याचे केले टक्कल…अनेकजण झाले अवाक
मैत्रीची वेगवेगळी रुपं आहेत त्यामुळे त्याला कुठल्याच एका व्याख्येत गुंडाळता येत नाही असे म्हणतात. आज अशाच एका मैत्रीची प्रचिती घडून आली… ती म्हणजे मराठी सृष्टीतील नावाजलेल्या या तिघी अभिनेत्रिंनी आपल्या मैत्रीसाठी काहीही म्हणत आपल्याच डोक्याच्या मागील बाजूचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. खरं तर या तिघीही मराठी मालिका, चित्रपट तसेच …
Read More »रामायण मालिकेतील ‘भरत’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता
प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शन वाहिनीवर रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले गेले होते. या मालिकेत बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, संजय जोग यांसारखे बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच भरतची भूमिका अभिनेते “संजय जोग” यांनी साकारली आहे. संजय जोग हे मूळचे नागपूरचे. त्यांचे आजोबा ‘नाना जोग’ हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक …
Read More »नुकतीच विवाहबद्ध झालेली ही प्रसिद्ध अभिनेत्री पतीसह चालवते नाश्ता सेंटर
लॉ क डाऊ न दरम्यान मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” देखील संगीतकार असलेल्या आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै रोजी विवाहबद्ध झाली होती. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाला आनंद …
Read More »“मी तर रोज रडतीये, मला तर रोज त्रास होतोय”…अभिनेत्री मयुरी देशमुखचे तुम्हा सर्वांना आवाहन
पतीच्या निधनानंतर अभिनेत्री मयुरी देशमुख इमली या स्टार प्लस वरील मालिकेमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकली. आपली सगळी दुःख विसरून पुन्हा एकदा ती जोमाने काम करण्यास सज्ज झाली. परंतु डॉ शीतल आमटे यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे मयुरी पुन्हा एकदा भावुक झाली या भावनेतून तिने चाहत्यांना आवाहन करत एक व्हिडिओ शेअर केला …
Read More »माझा होशील ना मालिकेतील सुलेखा तळवलकर यांची मुलगी दिसते खूपच सुंदर… आईसोबत मिळून करते हे काम
झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेत सईच्या आईची अर्थात शर्मिला बिराजदारची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी. असंभव, कुंकू, असे हे कन्यादान, धुरळा, कदाचित, अग्निहोत्र, चार दिवस सासूचे, अवंतिका, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, श्रीमान श्रीमती अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून सुलेखा तळवलकर यांनी आपल्या सजग अभिनयाची …
Read More »देवमाणूस मालिकेतील “विठ्ठल”ची भूमिका साकारणारा बालकलाकार आहे तरी कोण?
देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना …
Read More »