गरजुंची मदत करावी, एखाद्याने केलेले उपकार वेळीच फेडावेत असे अनेक संदेश तुम्ही अनेकदा ऐकले असतील आणि तुम्ही असं काही लोकांना सांगितलं देखील असेल. अशात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कायम वेळेला धावून येतात असं देखील म्हणतात आणि त्याचीच प्रचिती एका रिक्षाचालकाला आली. आपण केलेल्या पुण्याईमुळे एका क्षणात तो कोटींच्या संपत्तीचा मालक झाला. ही कहाणी आहे ओडिसामध्ये राहणाऱ्या बुद्धा नावाच्या एका व्यक्तीची. गेली २५ वर्षे तो ओडिसामध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत आहे.

आपल्या कुटुंबासह तो एका छोट्या घरात गरिबीत मात्र आनंदी आयुष्य जगत होता. अशात एकदा मिनाती पटनायक यांच्याशी त्याची ओळख झाली. मिनाती यांचं वय ६३ वर्षे असून त्या एकट्याच १ कोटींच्या संपत्तीच्या मालकीन आहेत. अशात मिनाती या घरामध्ये त्यांचे पती आणि मुली बरोबर राहत होत्या. मात्र दुर्दैवाने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलीचे देखील अचानक निधन झाले. त्यावेळी मिनाती पूर्णतः खचून गेल्या होत्या. या धक्क्यातून सावरायला त्यांना बराच काळ लगला. मात्र यावेळी त्यांना त्यांच्या परिवारातील इतर नातेवइकांकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. पण बुद्धा हा रिक्षचालक त्यांच्या या दुःखद परिस्थीत भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला. तो कायम आपल्या आई प्रमाणे मिनाती यांची निस्वार्थ मनाने सेवा करत होता. रिक्षा चालक असल्याने त्याची परिस्थिती तशी हालाकीचीच होती. डोक्यावर हक्काचं स्वतःच असं छत नव्हतं. त्याची परिस्थिती आणि आपल्याला केलेलं सहकार्य पाहता मिनाती यांनी आपल्या एक कोटींच्या संपत्तीला त्याचे नाव वारसदार म्हणून लावले.

आणि अशा प्रकारे एक गरीब रिक्षचालक रातोरात १ कोटींच्या संपत्तीचा मालक झाला. एका मध्यामाला मुलाखत देताना त्या म्हणाल्या की, “माझे पती आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मी पूर्णतः खचून गेले होते. माझ्या नातेाइकांनी त्यावेळी माझी काहीच चौकशी केली नाही. तू जेवलीस का? कशी आहेस? असं देखील कोणी विचारलं नाही. पण बुद्धाने माझी खूप सेवा केली आणि करत आहे. आता त्याने केलेली ही सेवा मी त्याला पुन्हा तर देऊ शकत नाही. मात्र माझ्याकडे असलेलं हे घर मी त्याच्या नावे करू शकते. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.” त्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वजण कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. नातीगोती फक्त प्रसिद्धीच्या आणि उमीदीच्या काळातच कामी येतात आपल्याकडे जेंव्हा काही उरात नाही आपण अडचणीत असू अश्यावेळी हि मंडळी पुढे येऊन मदत करत नाहीत मग ह्या लोकांना आपली संपत्ती जाण्यापेक्षा एका गरजूला आणि ज्याने अडचणीच्या वेळेत आपली मदत केली अश्या व्यक्तीला वारसदार म्हणून घेतलेला हा निर्णय अगदी योग्य असल्याचं अनेकांचं मत आहे.