Breaking News
Home / ठळक बातम्या / वृद्धपकाळात या प्रसिद्ध अभिनेत्रीचे होतायत हाल नातेवाईक असूनही राहतात वृद्धाश्रमात

वृद्धपकाळात या प्रसिद्ध अभिनेत्रीचे होतायत हाल नातेवाईक असूनही राहतात वृद्धाश्रमात

वृद्धपकाळात अनेक कलाकारांची परवड होते मग ती आर्थिक परिस्थितीने असो वा शारीरिक प्रत्येकालाच या अनुभवातून एक ना एक दिवस जावेच लागते हे न चुकलेले गणित…आज अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या आजारपणामुळे नातेवाईक असूनही वृद्धाश्रमात जीवन व्यतीत करत आहेत. त्यांचे नाव आहे “चित्रा नवाथे”. चित्रा नवाथे या पूर्वाश्रमीच्या कुसुम सुखटणकर होय. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार.

rekha kamat and chitra navathe
rekha kamat and chitra navathe

मुंबईत भवानीशंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे ७ वीपर्यंतचे शिक्षण झाले आणि आर्थिक परिस्थितीमुळे चित्रा यांना विद्यामंदिराऐवजी चित्रमंदिरात प्रवेश करावा लागला. त्यांनी चित्रपट स्टुडिओचा उंबरठा ओलांडला आणि कलावंत म्हणून ग.दि. माडगूळकरांनी दिलेले ‘चित्रा’ हे नाव सार्थ करून दाखवले. १९५१ साली ‘ लाखाची गोष्ट’ हा त्यांनी प्रमुख नायिका म्हणून पहिला चित्रपट साकारला होता. त्यानंतर वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलविता धनी या चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या तर बोक्या सातबंडे, अगडबम, टिंग्या या चित्रपटात त्यांनी आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रा यांचे लग्न सहदिग्दर्शक राजा नवाथे यांच्यासोबत झाले होते. राज कपूर यांच्या ‘आह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक म्हणून राजा नवाथे काम सांभाळत होते तर चित्रा यांना या चित्रपटातील एका गाण्यात नृत्य करायचे होते इथेच या दोघांची ओळख झाली. लग्नानंतर मात्र त्या फारशा कुठल्या चित्रपटात दिसल्या नाही. त्यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते तर पती राजा नवाथे यांचेही २००५ साली आजारपणाने निधन झाले.

chitra navathe marathi actress
chitra navathe marathi actress

जुहू येथील बंगल्यात त्या एकट्याच राहत होत्या. मधल्या काळात त्यांनी काही चित्रपटातून आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या त्या भूमिकांचे पुरस्कार देऊन कौतुक केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने त्यांना सरला नर्सिंग होममध्ये ठेवलं होतं मात्र महा ‘मारीच्या काळात तेथून त्यांना निघून जाण्यास सांगितलं. मधल्या काळात त्या कुठे होत्या याचा ठावठिकाणा त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा नव्हता मात्र नुकतेच त्या मुलुंड येथील “गोल्डन वृद्धाश्रमात” असल्याचे समोर आले आहे. चित्रा नवाथे यांची सख्खी बहीण “रेखा कामत” या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. लाखाची गोष्ट या चित्रपटात दोघी बहिणींनी एकत्रित काम केले होते. तर एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकेतून त्यांनी माईंची भूमिका साकारली होती. सध्या रेखा कामत यांनीही वृद्धपकाळाने अभिनयातून निवृत्ती स्वीकारली आहे. मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका हिच्याशी या दोघींचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. एवढे असूनही चित्रा नवाथे यांना आज वृद्धाश्रमाची वाट धरावी लागली आहे ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *