आज रविवारी १७ नोव्हेंबर रोजी माझी तुझी रेशीमगाठ मालिका फेम अभिनेता निखिल राजेशिर्के आणि चैत्राली विवाहबंधनात अडकले आहेत. पुण्यात पारंपरिक पद्धतीने निखिल चैत्रालीचा हा विवाहसोहळा पार पडला असून अभिनेत्री अभिज्ञा भावे सह अनेक मराठी सेलिब्रिटींनी या लग्नाला खास हजेरी लावलेली पाहायला मिळाली. निखिल राजेशिर्के याने लग्नात शेरवानी तर नववधू चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. गेल्या दोन दिवसांपासून निखिलच्या लग्नाची लगबग पाहायला मिळाली होती. श्री गोपालकृष्ण मंदिर मुंबई येथे हा विवाह सोहळा संपंन्न झाला.
हळद, मेंदी आणि आज त्यांचा लग्नसोहळा पार पडला. निखिल राजेशिर्के हा गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहे. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये तो सहभागी झाला होता. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत तो परिच्या बाबांची नकारात्मक भूमिका साकारताना दिसला होता. तुला शिकविन चांगलाच धडा, रंग माझा वेगळा, अजूनही बरसात आहे अशा मालिकेतही तो महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. एप्रिल महिन्यात निखिल आणि चैत्रालीचा साखरपुडा पार पडला होता, त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात ते दोघे विवाहबद्ध झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने चैत्रालीसोबत प्रिवेडिंग फोटोशूट केले होते.
दोघांचे हे लग्न अरेंज मॅरेज आहे. निखीलच्या वडिलांच्या मित्राची मुलगी असल्याने ती नेहमी निखिलच्या घरी येत असे. आई आणि बाबांची ती खूप काळजी घेते असेही तो या अरेंज मॅरेजबद्दल सांगताना दिसतो. आज श्री गोपालकृष्ण मंदिर मुंबई येथे हे लग्न पार पडत असताना सेलिब्रिटींनाही त्याच्या या लग्नाची उत्सुकता लागून होती. त्यामुळे वेळ काढून ही कलाकार मंडळी मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिली.