माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच नेहा आणि यशच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १२ जून रोजी मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे त्यात नेहा आणि यशच्या लग्नाचा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजच यश आणि नेहाच्या लग्नाच्या सोहळ्याचे चित्रीकरण पार पडले आहे. या लग्नसोहळ्यात पिंक कलरची थीम आखली आहे. पिंक रंगाच्या नऊवारी साडीत नेहाचा लूक अगदीच खुलून आलेला पाहायला मिळतो आहे. तर यशने देखील पिंक कलरचा कुर्ता आणि मरून रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

तर तिकडे लाडकी परी आपल्या आई आणि फ्रेंडच्या लग्नाला पिंक कलरच्या ड्रेसमध्ये नटून बसलेली दिसली. मालिकेचे लग्नसोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून या लग्नाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे ज्यात यश घोडीवर बसून लग्नमंडपात आलेला पाहायला मिळाला. मागून वरातीमध्ये समीर, काका, काकू, मीनाक्षी, शेफाली नाचत येत मंडपात हजेरी लावताना दिसतात. प्रार्थना बेहरे आपल्या लुकबाबत म्हणते की मी माझ्या स्वतःच्या लग्नात देखील एवढी नटले नव्हते. हळद, मेहेंदीचा सोहळा या मालिकेमुळे मला अनुभवायला मिळाला. माझ्या लग्नात जी मेकअप आर्टिस्ट होती तिनेच आज माझा मेकअप केला आहे. मी माझ्या लग्नात एवढी नटले नव्हते हे मेकअप आर्टिस्टनेच अधोरेखित केले. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे असे प्रार्थना म्हणते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न कधी पाहायला मिळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आता लवकरच मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

अर्थात या लग्नामध्ये काही अडथळे तर येणार नाहीत ना अशी पुसटशी शंका उपस्थित होते. कारण नेहाचा सोडून गेलेला नवरा या लग्नात तर हजेरी लावून गोंधळ घालणार नाही ना?. असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात मसलिकेतला हा ट्विस्ट सध्या यांच्या लग्नात येऊ नये अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणार हे लग्न सुखरूप पार पडावे अशीच आशा व्यक्त होत असली तरी गप्प बसून असलेली सिम्मी काकू या आनंदाच्या क्षणी मिठाचा खडा नक्की टाकणार असे मत मालिकेचे प्रेक्षक व्यक्त करत आहेत. मालिकेतला हा धक्कादायक ट्विस्ट लवकरच येणार असला तरी नेहा आणि यशचे लग्न सुखरूप पार पडो अशी एक माफक अपेक्षा आहे. पुढच्या रविवारच्या विशेष भागात मालिकेतील हा लग्नसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने या भागाची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे.