साधारण एक वर्षापूर्वी एका लग्नात ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. नाच रे मोरा हे खरं तर एक बालगीत म्हणून आजवर ओळखले जात होते मात्र लग्नाच्या वरातीत हे गाणं इतकं हिट होईल याची त्यावेळी कोणी कल्पनाच केलेली नव्हती. या डान्सच्या हिट नंतर बहुतेक लग्नाच्या वरातीत हे गाणं वाजवलेलं पाहायला मिळू लागलं. १९५३ साली देवबाप्पा हा मराठी चित्रपट प्रदर्शीत झाला होता या चित्रपटातलं ग दि माडगूळकर यांनी रचलेलं हे गीत लहानपणी सर्वांच्याच परिचयाचं झालं होतं.

मात्र एका अवलीयाच्या डान्समुळे हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की प्रत्येकजण त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू लागलं. त्यानंतर हा अवलीया कोण आहे याचीही विचारणा करण्यात येऊ लागली होती. शेवटी या अवलियाचा शोध घेऊन काही मीडिया माध्यमांनी त्याची मुलाखत घेतली. नाच रे मोरा गाण्यातील विशिष्ट डान्स प्रकारामुळे अभिषेक ढाळे हा अवलिया प्रकाशझोतात आला. याच लग्नाच्या वरातीत अभिषेकने ‘चलाओ ना नैनो से बाणरे’..या गण्यावरही डान्स केला होता मात्र नाच रे मोरा या गाण्यावरील त्याच्या डान्सला सोशल मीडियावर करोडोंच्या संख्येने लोकप्रियता मिळवून दिली होती. अभिषेक ढाळे हा बिबवेवाडीत राहणारा तरुण आहे. त्याचं स्वतःचं ज्वेलरीचं दुकान आहे. अभिषेकचा डान्स करण्याचा छंद त्याला मोठी लोकप्रियता मिळवून देताना दिसला. एका कोळीगीतावर देखील त्याने डान्स केलेला होता मात्र नाच रे मोराची त्याची स्टाईलच जगावेगळी असलेली पाहायला मिळाली होती. त्यावरून त्याला मोराचीही उपमा देण्यात येऊ लागली.

हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अभिषेकला मोठ्या प्रमाणावर लोकांनी डान्स आवडल्याचे मेसेजेस करण्यास सुरुवात केली. जे मित्र कधी बोलतही नव्हते ते मित्र स्वतःहोऊन बोलायला येऊ लागले असे अभिषेक मुलाखतीतून सांगताना दिसला. आता हाच अभिषेक स्वतःच्याच लग्नात देखील त्याच गाण्यावर नाचताना पाहायला मिळाला. त्यामुळे अभिषेक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला पाहायला मिळतो आहे. सहा दिवसांपूर्वी अभिषेकचे लग्न मोठया थाटात पार पडले. यावेळी त्याने नाच रे मोरा या गाण्यावर पुन्हा एकदा ठेका धरलेला पाहायला मिळाला. अभिषेकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्याला तमाम चाहत्यांकडून शुभेच्छा मिळताना दिसत आहेत.