किचन कल्लाकार या झी मराठी वरच्या शो मध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता ही मजा मस्ती अधिकच द्विगुणित करायला आणि धमाल उडवायला चिमुकल्यांची एन्ट्री केली जाणार आहे. सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायरा वायकुळ, खारी बिस्कीट चित्रपटातली बालकलाकार वेदश्री खाडिलकर आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम स्वरा जोशी किचन कल्लाकारच्या शोमध्ये दाखल झाल्या आहेत. जयंती ताईंनी दही साखर खाऊ घालून किचन कल्लाकारच्या या खास एपिसोडची सुरुवात केली आहे. चिमुरड्यांची ही धमालमस्ती पाहायला प्रेक्षक देखील खूपच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.

येत्या बुधवारी २ फेब्रुवारी २०२२ रोजीचा किचन कल्लाकारचा हा बालकलाकार स्पेशल एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ह्या चिमुकल्यासोबत त्यांचे आई वडील देखील मंचावर दाखल होणार आहेत. पदार्थ बनवत असताना प्रत्येक कलाकारांची धमाल उडते अशीच धमाल मायराच्या बाबतीत देखील उडालेली पहायला मिळणार आहे. नुकताच या खास एपिसोडचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात मायराला सांगितलेला एक पदार्थ बनवण्यासाठी साहित्य समोर ठेवण्यात आले तीच्या समोर असलेली ही सर्व सामग्री पाहून मायरा पुरती गोंधळलेली पाहायला मिळत आहे. ‘मी कधीच बनवलेलं नव्हतं जेवढं मला जमेल तेवढंच मी बनवू शकत होती पण हेsss… जास्तीच आहे बाबा…मी ट्राय करून बघते जमेल तर जमेल…’ असे म्हणत मायरा तिच्या बोलण्याने मंचावर एकच धमाल उडवून देते. मायरा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील कलाकारांची नक्कल करताना इथेसुद्धा दिसणार आहे. सिम्मी काकूंची आणि संकर्षण कऱ्हाडेची नक्कल तिने याअगोदर मालिकेच्या सेटवर केली होती.

तिचे हे दोन्ही नक्कल करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. तीच नक्कल आता ती किचन कल्लाकारच्या शोमध्ये दाखवताना दिसणार आहे. संकर्षण कऱ्हाडे सोबत मायराचे खूप छान बॉंडिंग जुळून आलं आहे त्यांचे हे बॉंडिंग किचन कल्लाकारच्या मंचावर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा बुधवरचा हा स्पेशल एपिसोड प्रेक्षक मिस करणार नाहीत याची खात्री आहे. किचन कल्लाकर मध्ये ह्या चिमुकल्यांनी विशेष काळजी घेतली गेली असल्याचं दिसून येतंय. खाद्य पदार्थ बनवताना गॅस आणि चाकूचा कमीत कमी वापर करण्यासाठी तश्याप्रकारचे पदार्थ त्यांना दिले गेले आहे. शिवाय राजशेफ जयंती ताई यांचे विशेष लक्ष आणि मार्गदर्शनाखाली सर्व पदार्थ बनवले जाणार आहेत. लहान लेकरांना मराठमोळ पदार्थांचा खाऊं घालण्याचा करूया घाट… आपल्या खाद्य संस्कृतीचं वसा देऊया …चला आपण दाखवू त्यांना वाट.