
अनके मालिका तसेच चित्रपटांत आपल्या संगीताची छाप पडणाऱ्या एक उत्तम संगीतकार आणि कम्पोझर म्हणून ओळख असणाऱ्या समीर सप्तीसकरचा नुकताच साखरपुडा झालाय. मरसिद्ध मराठी चित्रपट दुनियादारी साठी समीर सप्तीसकरच अनेकांनी कौतुक केलं होत. झी वरील अनेक मालिकांना देखील समीर सप्तीसकर ह्याचाच संगीत असत. चित्रपट असो वा मालिका समीर सप्तीसकरला विशेष प्राधान्य दिल जात. समीर सप्तीसकरचा नुकताच साखरपुडा झालाय आणि थोड्याच दिवसात तो लग्नाच्या बंधनात देखील अडकला जाणार आहे.

समीर सप्तीसकरने ज्ञानदा पवारसोबत नुकताच साखरपुडा केलाय. ज्ञानदा पवार हि अभिनय क्षेत्राशी निगडित नसल्याचं दिसून येत. जवळचे नातेवाईक आणि काही मित्रमंडळींनी ह्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. सरकारचे सर्व नियम पाळून त्यांनी हा सोहळा साखरपुड्याच्या सोहळा उत्साहात साजरा केलेला पाहायला मिळाला. ‘खुलता कळी खुलेना’ आणि पहिले ना मी तुला या मालिकेसाठी त्याने दिलेलं संगीत विशेष लोकप्रिय ठरलं. तर दुनियादारी चित्रपटातली सगळी गाणी त्याच्या संगीतामुळे लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली. दुनियादारीच्या यशानंतर त्याने योगेश सोमण ऋचा आपटे आणि ऋता दुर्गुळे हिची प्रमुख भूमिका असलेल्या लव्हस्टोरी ‘अनन्या’ सिनेमासाठीही समीरने संगीत दिलेलं पाहायला मिळालं. संगीतकार, गिटारिस्ट आणि एक उत्तम गायक म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवलाय. त्याचा स्वतःचा म्युजिक बँड देखील आहे. संगीतकार समीर सप्तीसकरने आणि ज्ञानदा पवार ह्यांना त्यांच्या जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….