![muramba serial latest episode news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/08/765343543.jpg)
स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. रमा आणि अक्षय यांचे सूर जुळू लागले असतानाच मालिकेत एक भयंकर ट्विस्ट आलेला आहे. रमा आणि अक्षयच्या नात्यात सतत लुडबुड करणारी रेवा आता या ट्विस्टमुळे बाजी पलटवताना पाहायला मिळत आहे. रेवाने अभिसोबत लग्न करून मुकादम कुटुंबात प्रवेश केला. पण आता अक्षयला रेवाची सर्व कट कारस्थानं समजली असल्याने रेवा अक्षयला घराच्या छतावरून खाली ढकलून देते. अक्षयला यामुळे मोठी दुखापत होते. तो हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवेल अशी रेवाला अपेक्षा आहे पण आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला आहे त्यामुळे कथानकाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
अक्षयला रमासोबत लग्न झाल्याचे काहीच आठवत नसते. तेव्हा रेवा हा सगळा प्रकार पाहून खुश होते. त्यात आता अक्षय रेवाच्या प्रेमात असल्याचे सगळ्यांना संगतो. तेव्हा मुकादम कुटुंब शॉक मध्ये जातं. अक्षयला आताचं काहीच आठवत नसल्याचे डॉक्टर सांगतात तेव्हा आता या नव्या संकटाला रमा कशी तोंड देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. पण मालिकेच्या या ट्विस्टमुळे प्रेक्षक मात्र चांगलेच संतापले आहेत. रमा आणि अक्षय यांचा संसार सुरळीत कधी सुरू होणार आणि मालिकेत सकारात्मक गोष्टी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न या भडकलेल्या प्रेक्षकांनी विचारला आहे.
![muramba serial news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/08/76453553453.jpg)
अक्षयचा अपघात घडून येण्याआधी तो रमाला भेटून त्याचा प्लॅन सांगत असतो. रेवासोबत तो प्रेमाचे नाटक करणार अशी तिला शाश्वती देतो. रेवा कडून सगळ्या गोष्टी काढून घेण्यासाठी अक्षयने या प्लॅन रचलेला असतो. मात्र आता अक्षय स्वतःच त्याची स्मृती गमावताना पहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही मालिका आणखी काही दिवस वाढणार याचा प्रेक्षकांना संताप झालेला आहे. रेवाचा प्लॅन उलगडल्यानंतर मालिका निर्णायक वळणावर येणे अपेक्षित होतं मात्र इथे भलताच प्रकार घडत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवण्यास सुरुवात केली आहे.