मुळशी पॅटर्न चित्रपटात झळकलेले अभिनेत्री मालविका गायकवाड हि सर्वपरिचित आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात तिने चहाची टपरी चालवणाऱ्या मुलीची राहुल्याच्या प्रेयसीची मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री मालविका गायकवाड ही एक इंजिनिअर आहे. मालविकाने सिनेसृष्टीत येण्याआधी एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होती परंतु तिला नोकरी करण्यात फारसा रस नव्हता. निसर्गाशी जवळीकता वाढवणारी शेती तिला खुणावू लागली. मालविकाला शेती करायची खुपच इच्छा होती. यामुळे अभिनयापासून दूर जात तिने सेंद्रिय शेती करण्यास प्राधान्य दिले याच बरोबर ती शेतकऱ्यांना देखील मदत करू लागली.

एक अभिनेत्री जिला चित्रपट क्षेत्रात चांगलं यशमिळालं तरी देखील तिने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला हे पाहून नातेवाईक आणि मित्र मंडळींनी वेड्यात काढले. मात्र आता दुसरं काही करायचं नाही आपण जे करतोय त्यातच काहीतरी करून दाखवायचं असा ठाम निर्णय घेतला. तिने स्वतःची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली याचा थेट फायदा शेतकऱ्यांना देखील झाला आता ह्याच सेंद्रिय शेती सोबत तिने आणखीन दोन मित्रांना सोबत घेऊन दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय सुरु केला. विशाल चौधरी, मालविका गायकवाड आणि जयवंत पाटील यांनी एकत्र येऊन हंपी A२ नावाची दुधाच्या पदार्थांची कंपनी स्थापन केली. शेतकऱ्यां सोबत असलेली तिची आपुलकी तिला ह्या व्यवसायात खूप कामी आली. थेट शेतकऱ्यांकडून दूध घेऊन त्यांनी हा व्यवसाय कमी काळात मोठ्या प्रमाणात सुरु केला. दूध, तूप, दही,पनीर साच सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बानू लागले. स्वतःचा ब्रँड तयार करत त्यांची कंपनी आता तब्बल १८ कोटींच्या घरात गेली आहे. वर्षाला जवळपास ४ कोटींचा नफा ते यातून कमावताना पाहायला मिळतात.

मालविका गायकवाड हि पुण्यातच मोठी झाली पुण्यातच तिने संपूर्ण शिक्षण घेतलं. सिंहगड कॉलेज मधून तिने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. एकदा जिममध्ये वर्क आऊट करताना प्रवीण तरडे ह्यांच्या मित्राने तिला चित्रपटात काम करणार का असं विचारलं. त्यावर तिने हसून मला त्यातलं काही माहित नाही पण चित्रपट काम करायला आवडेल असं म्हटलं. मग काय मित्राने प्रवीण तरडे ह्यांची भेट घालून दिली आणि मुळशी पॅटर्न मध्ये झळकायची संधी तिला मिळाली. पण आपल्याला शेती करण्यातच विशेष रस आहे असं ती नेहमी म्हणायची आणि तिने ते करून दाखवत मोठं यश देखील संपादन केलेलं पाहायला मिळतंय. अनेकांना हे माहित नसेल कि मालविका हि बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. २०२० साली मालविका ही सिद्धार्थ सिंघवी या आपल्या मित्रासोबत लग्नाच्या बंधनात अडकली. मालविकाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…