जरा हटके

“मुलगी झाली हो” मालिकेतील अभिनेत्री करणार लवकरच लग्न केळवणचे फोटो होतायेत व्हायरल

मुलगी झाली हो ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवताना दिसत आहे. विशेष म्हणजे साजिरी आणि शौनकचे नुकतेच लग्न झाले आहे. हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून आता शौनकला मात्र विलासने घेतलेल्या परिक्षेला तोंड द्यावे लागत आहे. शौनकचा संसार सुरळीत चालावा म्हणून तो नोकरीच्या शोधात आहे .यात त्याला कधी यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. साजिरी आणि शौनक यांच्या लग्नानंतर मालिकेतील अभिनेत्री आता खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नाच्या बेडीत अडकताना दिसणार आहे. मुलगी झाली हो या मालिकेतील साजिरीची वहिनी म्हणजेच आर्याची भूमिका निभावणारी अभिनेत्री लवकरच लग्न करत आहे

mulgi zali ho serial actress
mulgi zali ho serial actress

नुकतेच तिने केळवण साजरे झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच आर्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे. मालिकेत आर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे ‘श्वेता अंबिकर’. शौनक आणि साजिरीचे लग्न जुळावे म्हणून आर्याने खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे मालिकेतील आर्या हे पात्र प्रेक्षकांची वेळोवेळी दाद मिळवताना दिसले आहे. साजिरी, विलास, रोहन, आज्जी याप्रमाणे आर्याचे पात्र देखील मालिकेत खूपच खाऊन जाताना दिसते. मुलगी झाली हो मालिकेमुळे श्वेताला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. ही लोकप्रियता अनुभवत असतानाच तिने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ललित कला केंद्र मध्ये श्वेताची अमेय गोरे याच्यासोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. श्वेता आणि अमेय आता लवकरच लग्न देखील करणार आहेत. नुकतेच श्वेताने केळवण साजरे झालेले फोटो पोस्ट केले आहेत. अमेय आणि श्वेता यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. अमेय स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहे यासोबतच त्याने काही नाटकांमधून अभिनय देखील साकारला आहे. याशिवाय तो स्वतःची एक नाट्य अकॅडमी चालवत आहे आणि यातून अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाचे धडे त्याने दिले आहेत.

actress shweta amblikar photo
actress shweta ambikar photo

श्वेता अंबिकर ही मूळची पुण्याची. अभिनयाची आवड असलेल्या श्वेताने ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिनयाच्या प्रवासात तिला अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटातून काम करता आले. नाटकांतून काम करत असताना श्वेताने माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. दुर्वा, दिल दोस्ती दुनियादारी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजी या मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळत गेली. छोट्या भूविकास करणार नाही या ठाम मतावर असलेल्या श्वेताने गाजलेल्या मालिकांमधून मुख्य भूमिका निभावल्या आहेत. अगदी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील छोट्या राणूअक्का असो वा दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील रेवा या भूमिकांमुळे श्वेताला नवी ओळख मिळत गेली.अभिनयाचा ठसा उमटवत असताना शॉर्टफिल्ममधूनही ती प्रेक्षकांसमोर आली. अभिनयाचा तिचा प्रवास उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे त्याचमुळे श्वेता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button