Breaking News
Home / जरा हटके / हा अभिनेता आहे माऊचा बॉयफ्रेंड बिर्थडेच्या दिवशी दिले खास सरप्राईज

हा अभिनेता आहे माऊचा बॉयफ्रेंड बिर्थडेच्या दिवशी दिले खास सरप्राईज

स्टार प्रवाहवरील “मुलगी झाली हो” या मालिकेत माऊचे पात्र साकारले आहे “दिव्या सुभाष पुगावकर” ह्या अभिनेत्रीने. २१ जुलै रोजी अभिनेत्री दिव्याचा वाढदिवस असतो. या दिवशी मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांनी मिळून दिव्याचा वाढदिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसादिनी तिच्या बॉयफ्रेंडने अचानक सेटवर येऊन दिव्याला बिर्थडे सरप्राईज दिले. आपल्या बॉयफ्रेंडला समोर पाहून दिव्या भलतीच खुश झालेली पाहायला मिळाली या आनंदात तिने आपल्या बॉयफ्रेंडला घट्ट मिठी मारली.

divua and akshay gharat
divua and akshay gharat

“मुलगी झाली हो” मालिकेच्या सेटवर त्याने दिलेले हे सरप्राईजने दिव्या पूर्णपणे भारावून गेली. तिच्या या बॉयफ्रेंडचे नाव आहे. “अक्षय घरत”. अक्षय घरत खूपच हँडसम असून तो फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या खूप आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.नुमत्याच झालेल्या दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने सेटवर येऊन तिच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केली होती यात तिच्या सहकलाकारांनी अक्षयला मदत देखील केली. दिव्याने सेटवर दिलेल्या अक्षयच्या या सरप्राईजला आजवर दिलेले सर्वात बेस्ट सरप्राईज आहे असे म्हणून अक्षयचे आभार मानले. त्यामुळे दिव्या सिंगल नसून तिला बॉयफ्रेंड आहे हे आता तिच्या चाहत्यांना समजले आहे. दिव्याच्या सौंदर्यावर भाळलेल्या तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच धक्का देणारी ठरेल हे वेगळे सांगायला नको. मूळची माणगावची असलेल्या दिव्याने २०१९ सालच्या ‘श्रावण क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवून मिस टॅलेंटेडचा मान पटकावला होता.

divya pugaonkar mulgi zali ho
divya pugaonkar mulgi zali ho

मॉडेलिंगची आवड असलेल्या दिव्याने २०१७ साली मुंबईची सुकन्या स्पर्धेत मोस्ट पॉप्युलर फेसचे मानांकन प्राप्त केले होते. दिव्या माणगावची असली तरीही तिचे संपूर्ण शिक्षण मात्र मुंबईतच पूर्ण झाले आहे. दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेअगोदर ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा ‘माऊची’ प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिने साकारलेल्या माऊच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य असणाऱ्या आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री “दिव्या सुभाष पुगावकर” हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *