चंदेरी दुनियेत बहुतेक कलाकार हे याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या जोडीदाराची निवड करतात. कारण या क्षेत्राचे बारकावे कलाकारांनी जवळून अनुभवलेले असतात त्यामुळे दोघांनाही आयुष्यातल्या चढ उतारांची चांगली जाणीव असते. मालिका चित्रपट अभिनेता अमेय बोरकर याच्या पत्नीने नुकतेच दूरदर्शन वाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. उच्च शिक्षण असूनही हातात गलेलठ्ठ पगाराची नोकरी असूनही तिने निवडलेल्या या क्षेत्राचे अमेय बोरकरने मात्र तोंडभरून कौतुक केले आहे.

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत अमेय सध्या कॅडेट संजयचे पात्र साकारत आहे. या मालिकेअगोदर अमेय बोरकर याने मालिका आणि नाटकातून कमी केले आहे. स्टार प्रवाहवरील मोलकरीण बाई या मालिकेत अमेयने ‘सत्या’ची भूमिका गाजवली होती. सत्याच्या दमदार भूमिकेमुळे अमेय प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. झी मराठीवरील जाडुबाई जोरात या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. डोंबिवली रिटर्न, वर खाली दोन पाय अशा नाटक आणि चित्रपटातून त्याने अभिनय साकारला होता. २०१६ साली भक्ती सावंत हिच्याशी अमेय बोरकर विवाहबद्ध झाला. भक्ती ही उच्छशिक्षित असून तिने मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लग्नानंतर घर संसारात रमलेल्या भक्तीला दूरदर्शन वाहिनीवर वृत्तनिवेदीका म्हणून काम करण्याची नामी संधी मिळाली आहे. तिच्या या निर्णयामुळे अमेय मात्र तिच्यावर भलताच खुश झाला आहे. कारण त्याला अमेयने एक खास कारण सांगितले आहे.

‘आज दूरदर्शन साठी वृत्तनिवेदिका म्हणून नवीन सुरुवात करते आहेस.. तुझ्या चिकाटी आणि हिंमतीला सलाम.. सोपं नसतं आपलं सगळं उच्च-शिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी, आरामदायी आयुष्य बाजूला ठेवून काही तरी नवीन करून दाखवणं.. तू ते करून दाखवलंस आणि तेही स्त्रीत्वाच्या पडणार्या सर्व नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडून.. प्राऊड ऑफ यू बायको. यापुढे ही अशीच नवीन चॅलेंजेस् स्वीकारत रहा.. सोप्या गोष्टींची हौस आहे कोणाला..’ त्याच्या ह्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय. भक्ती सावंत बोरकर हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…