झी मराठी वाहिनीवर “मिसेस मुख्यमंत्री” ही मालिका प्रसारित केली जात होती. समर आणि सुमीची जोडी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेतली सुमी हे कॅरॅक्टर आपल्या बिनधास्तपणा आणि डॅशिंग भूमिकेमुळे ओळखलं जायचं. ह्या सुमीची भूमिका साकारली होती अभिनेत्री “अमृता धोंगडे” हिने. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली असली तरी मिथुन या चित्रपटातून तिने कालाक्षेत्रात पाऊल टाकले होते. मूळची कोल्हापूरची असलेली अमृता कुटुंबासोबत पुण्यात स्थायिक झाली इथेच भारती विद्यापीठातून तिने बीएस्सीचे शिक्षण घेतले.

कॉलेजमध्ये असताना नाटकांतून तिने सहभाग दर्शवला होता यासोबतच शास्त्रीय नृत्याचेही धडे तिने गिरवले आहेत. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून अमाप प्रसिद्धी मिळाल्यानंतर सोनी मराठीवरील चांदणे शिंपित जाशी या मालिकेतून ती चारु ची भूमिका साकारत आहे. दोन दिवसांपूर्वी याच मालिकेतील अभिनेता अतुल आगलावे याच्यासोबत अमृताने फोटो शेअर करून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु नुसत्या शुभेच्छा न देता त्यासोबत तिने त्याचे भरभरून कौतुकही केलेले पाहायला मिळते आहे. कौतुकाची एक भली मोठी पोस्ट लिहून ‘I love You, Be always with me ‘ म्हणत तिने दिलेल्या या शुभेच्छा सध्या तरी बरेच काही सांगून जात असल्याचे चित्र दिसत आहे. अभिनेता अतुल आगलावे याला तुम्ही स्टार प्रवाहवरील मोलकरीणबाई मालिकेतून पाहिले असेल. मालिकेत त्याने साकारलेली रितीकची भूमिका खूपच हिट झाली होती. तू माझा सांगाती या मालिकेतून त्याने मराठी मालिका सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. भाऊ कदम सोबत नशीबवान चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली होती.

अभिनयाच्या वेडापायी कॉलेजमध्ये असताना त्याने नाटकांतून काम करण्यास सुरुवात केली होती. तू माझा सांगाती या मालिकेतून त्याचे पदार्पण झाले मात्र मोलकरीणबाई मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. याच भूमिकेने अतुलला खूप काही दिले आणि त्याला खरी ओळख मिळाली असे तो म्हणतो. अमृता आणि अतुल दोघेही चांदणे शिंपित जाशी या मालिकेतून एकत्रित काम करत आहेत. यात अतुल राहुलची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेच्या सेटवरच त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. अल्पावधीतच झालेली दोघांची ही मैत्री किती घनिष्ठ आहे तुम्हाला त्यांच्या फोटोंवरूनच लक्षात येईल . अमृताने अतुलच्या वाढदिवसादिवशी आणि बऱ्याचवेळा इंस्टाग्रामवरून त्याच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. बाकी हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का? याबाबत सध्या सेटवर आणि चाहत्यांमध्येही चर्चा पाहायला मिळत आहे. याअगोदर एकत्रित काम करत असताना अनेक कलाकारांचे सूर जुळून आलेले पाहायला मिळतात त्यात आता अमृता धोंगडे आणि अतुल आगलावे यांचेही नाव घेतले जात आहे.