Breaking News
Home / जरा हटके / मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मधील हि चिमुकली आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मधील हि चिमुकली आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोमध्ये सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका साकारली आहे . तर सिद्धार्थ चांदेकर आणि चिमुकली अवनी जोशी या दोघांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलली आहे. ह्या आठवड्यात सिद्धांत मोदी या चिमुकल्या स्पर्धकाने अशी ही बनवाबनवी चित्रपटातील गं कुणी तरी येणार येणार गं हे गाणं गाऊन प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसणार आहे. यावेळी सिद्धांताने साडी नेसली आहे आणि सचिन पिळगावकर यांनी अशी ही बनवाबनवी चित्रपटात जसा गेटअप केला होता.

actress avanee joshi
actress avanee joshi

अगदी तशाच गेटअपमध्ये सिद्धांत दिसत असल्याने सचिनजींनी सिद्धांतचे कौतुक केले आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या या भागाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या शोमधून सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांचे ट्युनिंग खूपच छान जुळले आहे. दोघांची नोकझोक सूत्रसंचालनातून नेहमीच पाहायला मिळते. एवढ्या कमी वयात अवनीचाही हजरजबाबीपणा प्रेक्षकांना विशेष भावलेला पाहायला मिळतो. शालेय अभ्यासासोबतच अवनीने अभिनय देखील केला आहे. स्टार प्रवाहवरील साथ दे तू मला या मालिकेतून अवनीने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अवनीला गायनाची देखील आवड आहे हे उपजत गुण तिला तिच्या आईवडीलांकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. कारण अवनीचे आई वडील म्हणजेच अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी हे दोघेही गायक आहेत. अनिरुद्ध जोशी यांनी अनेक मंचावरून गाण्याचे सादरीकरण केले आहे झी टीव्हीवरील आयडिया सारेगमप या शोचा विजेता तसेच सूर नवा ध्यास नवा ह्या शोचा विजेता ठरले होते. वेगवेगळ्या म्युजिक अल्बम मधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

avanee anirudh joshi family
avanee anirudh joshi family

अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी आपले सारे लक्ष संगीत क्षेत्रांवर केंद्रीत केले होते. टेक्सासमधून लॉ मध्ये आणि संगीत क्षेत्रामध्ये मास्टर्स त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून केले आहे. अवनीची आई रसिका जोशी या देखील गायिका आहेत. याखेरीज कलावती साडी या नावाने त्यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. मराठी सेलिब्रिटी विश्वात कलावती साड्यांना विशेष मागणी असते. अवनीला गायनाची आवड असल्याने तिची ही आवड जोपासण्यासाठी अनिरुद्ध आणि रसिका नेहमीच प्रोत्साहन देताना दिसतात. मालिकांमधून आणि सूत्रसंचालन अशा भूमिका निभावणारी अवनी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे. तिचा सहसुंदरपणा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद च्या मंचावरून अनुभवायला मिळतो. अवनीला तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *