माझ्या नवऱ्याची बायको या गाजलेल्या मालिकेत माया हे पात्र साकारले होते अभिनेत्री रुचिरा जाधव हिने. रुचिरा जाधव आगामी मराठी चित्रपट लकडाऊन बी पॉजिटीव्ह मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र रुचिरा तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे. रुचिराने काही तासांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती. ‘Will you marry me?’ तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच कलाकारांनी देखील आश्चर्य व्यक्त केलेले पाहायला मिळाले. तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तिच्या या पोस्टवर प्रमोशनचा भाग असावा असे म्हटले आहे.

मात्र ही पोस्ट अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असल्याने काही वेळातच तिने ती पोस्ट डिलीट केली. तिच्या या पोस्टवरून तिला कुणाला प्रपोज करायचे असावे असा अंदाज बांधला जात आहे. मात्र तिने असे का लिहिले आणि कोणासाठी लिहिले हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकांना हा प्रमोशनचा भाग वाटलं अनेक कलाकार मंडळी कोडी निर्माण करत येणाऱ्या नाटकाचा किंवा चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अश्या प्रकारे सोशिअल मीडियावर काहीतरी लिहून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना नेहमीच पाहायला मिळतात. मात्र काहीवेळातच रुचिराने आपल्या या पोस्ट बाबत खुलासा केलेला पाहायला मिळातो आहे. मी काही वेळापूर्वी केलेली पोस्ट डिलीट केली आहे . हे फक्त एक ‘धाडस’ होतं जे मी करण्याचं स्वीकारलं… तुम्हाला असा त्रास दिल्याबद्दल मी तुमची माफी मागते’… असे म्हणत अभिनेत्री रुचिरा जाधव हिने डिलीट केलेल्या पोस्टबद्दल हा खुलासा केला आहे.

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. जाही जाहिरातींसाठी तिने मॉडेलिंग देखील केलं आहे. २०१२ साली कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या वाचून करमेना’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे अशा मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीजमध्ये ती झळकली आहे. नुकतेच व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी ‘चांगली खेळलीस तू ‘ या ब्रेकअप सॉंगमध्ये ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती विरोधी भूमिका दर्शवताना दिसली होती. असो मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…