चित्रपट असो वा मालिका प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आयोजक मंडळी वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसतात. ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाच्या प्रमोशनवेळी पुण्यात बॅनर लागले होते. त्यावेळी हे बॅनर सर्वांचे लक्ष्य वेधून घेताना दिसले. अशाच अंदाजात सोयरीक या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चित्रपटाचा नायक नितीश चव्हान आणि नायिका मानसी भवाळकर यांनी ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय आमच्या जीवाला धोका आहे’ असा धक्कादायक खुलासा पोस्टद्वारे केलेला पाहायला मिळाला. अर्थात त्यानंतर हा सर्व चित्तपत आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी खटाटोप करण्यात आला हे कालांतराने स्पष्ट झाले होते.

अशी पोस्टरबाजी करून ही कलाकार मंडळी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतात मात्र यातून त्यांना कितपत फायदा होतो हे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतीसादावरूनच ठरवण्यात येते. मालिकेची प्रमुख पात्र गुलदस्त्यात ठेवणे असो किंवा आणखी काही युक्त्या ह्या सर्रास चर्चेत येताना दिसतात. अशाच काहीशा अंदाजात अनिता दाते हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘जो आवडतो सर्वांना’ असे कॅप्शन देऊन अनिता दाते हिने हार घातलेला स्वतःचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना धक्काच दिला आहे. अनिता दाते हिने हा फोटो का शेअर केला याचे कारण अजून कोणालाच उलगडलेले नसले टी हा कुठल्यातरी मालिकेचा किंवा चित्रपटासाठीचा पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. तिच्या या फोटोवर सेलिब्रिटींनी देखील आश्चर्यकारक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी आणिताची फिरकी घेण्याचाही पुरेपुर प्रयत्न केला आहे. अनिताने असा फोटो का शेअर केला या बाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे.

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने अनिता दाते हिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. २०१६ ते २०२१ म्हणजे जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनरंजन केले होते. अनिता दाते हिने या मालिकेत राधिकाची भूमिका साकारली होती. मी वसंतराव, अय्या, तुंबाड, कॉफी आणि बरंच काही अशा चित्रपटातून अनिताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चला हवा येऊ द्या शोमध्येही अनिताने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. तिने शेअर केलेल्या या फोटोवरून अनिता आता लवकरच आणखी एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसून येते. हा प्रोजेक्ट म्हणजे नाटक सिनेमा की मालिका असेल याचा उलगडा येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. या आगामी प्रोजेक्टसाठी अनिता दाते हीचे अभिनंदन आणि शुभेच्छा.