
झी मराठी वाहिनीच्या “माझ्या नवऱ्याची बायको” ह्या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री अनिता दाते केळकर हि आता आपल्याला चला हवा येऊ द्या मध्ये पाहायला मिळतेय. अनिता दाते हिने “अग्निहोत्र, मंथन, अनामिक, बंदिनी, एका लग्नाची गोष्ट अश्या अनेक मालिकांत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा तुंबाड हा चित्रपट चांगलाच गाजला होता. तुंबाड पूर्वी जोगवा, पोपट, आजोबा, अडगुळक्या मडगुळ्या, गंध असे अनेक चित्रपट तिने
साकारले आहेत. नुकतीच तिने सोशिअल मीडियावर परिधान केलेल्या साडीबद्दल विशेष माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. ती म्हणते…

“प्रत्येक साडीची एक गोष्ट असते. मी नेसलेली साडी इको तत्वची आहे. त्यांच्या टीम लक्ष्मी ने तयार केलेली. विदर्भातील किमान 40 ते 50 शेतकरी या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत. या शेतकऱ्यांना ऑरगॅनिक बियाणे देऊन कापूस उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाते. कापूस इको तत्व मार्केट पेक्षा अधिक किंमत देऊन विकत घेते. या संस्थेमध्ये किमान दोनशे महिला काम करतात. या महिलांना घरीच चरखा दिला जातो. घरातील काम सांभाळून या चरख्यावर आपल्या वेळेनुसार त्या सूतकताई करतात.इकोतत्वच्या साधारण शंभर ते दीडशे लूमज आहेत. तिथे या सुताचे कापडात रूपांतर होते. मी नेसलेली साडी केमिकल विरहित आहे.व्हेजिटेबल कलर डाय आणि हॅण्ड ब्लॉक प्रिंट ने सजवलेली आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ही साडी तयार करताना कुठेही इलेक्ट्रिसिटी चा वापर केलेला नाही.” आज मार्केटमध्ये तुम्हाला अनेक केमिकल आणि मशीनरी वापरून तयार केलेल्या अनेक साड्या स्वस्तात मिळतील पण तिने परिधान केलेल्या अश्या प्रकारच्या इको साड्याना जर महिलांनी परिधान करायला महत्व दिल तर अनेक गरजूंच्या हाताला काम मिळेल. शिवाय अश्या साड्या दिसायला देखील खूपच सुंदर असतात.