मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे अशातच रील लाईफमध्ये लोकप्रिय असलेले कपल म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश आणि नेहा लवकरच लग्न करणार आहेत. नेहा आणि यश यांचे लग्न कधी होणार याचीच गेले कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता लवकरच हा क्षण पाहायला मिळणार असल्याने या मालिकेची उत्सुकता वाढली आहे. यश आणि नेहाच्या लग्नाचे शूटिंग नुकतेच पार पडले आहे. या सोहळ्यात यश आणि नेहाची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली आहे. एका व्हिडिओत नेहा आणि यश बोटातली अंगठी दाखवताना दिसत आहेत तिथेच त्यांच्या मध्ये परी देखील उभी आहे.

या व्हिडिओत परी मालिकेच्या प्रेक्षकांना लग्नाला येण्याचे आमंत्रण देत आहे. ‘ कारण माझ्या आईचं आणि फ्रेंडचं लग्न होणार आहे.यायला विसरू नका हं सगळ्यांनी’. यश आणि नेहाच्या साखरपुड्याला एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला आहे. माझ्या मामाच्या, मावशीच्या लग्नाला यायचं हं! हे आजपर्यंत ऐकण्यात आलं होतं मात्र मालिकेतून प्रथमच माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं! असा मेसेज देण्यात आला आहे याबाबत प्रार्थना म्हणते की,’ ह्या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला जातोय, समाज एक पाऊल पुढे जात आहे, सोसायटी हे स्वीकारायला आता तयार झाली आहे. ज्या कोणी सिंगल मदर असतील त्यांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे तो आता त्यांना मिळू लागल्याने कुठेतरी हे दाखवताना खूप चांगलं वाटतंय. या मालिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा यशच्या भूमिकेत श्रेयस तळपदे असणार असे सांगितले तेव्हा मी लगेचच होकार दिला होता. त्याच्यासोबत काम करताना खूप मज्जा येतीये.’ असे म्हणत प्रार्थनाने श्रेयासचे कौतुक केले तर श्रेयसने देखील प्रार्थना सोबत काम करताना खूप छान वाटतंय असे म्हटले आहे.

मालिकेत आता यश आणि नेहाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झालेली पाहायला मिळणार आहे. परी नेहाचीच मुलगी आहे हे देखील आजोबांना समजणार असल्याने त्यांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. आता लवकरच मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळणार आहे. यश आणि नेहाच्या लग्नानंतर हि मालिका आटोपती घेणार कि काय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल पण झी वाहिनीची माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका सध्या चांगल्याच प्रसिद्धीच्या झोतात आहे त्यामुळे अजून काही काळ तरी मालिका अशीच चालू राहणार असच चित्र पाहायला मिळणार आहे यात शंका नाही. पण मग पुढे नक्की काय घडणार? मालिकेत ट्विस्ट निर्माण करण्यासाठी आणिखीन काय काय पाहायला मिळणार हे येत्या काही भागात पाहायला मिळेलच.