माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश नेहाला स्वतःबद्दल खरं सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी काकू यशला फोन करून नेहाच्या दुसऱ्या लग्नाबाबत तिला राजी करायला सांगतात. काकूंच्या आग्रहाखातर यश नेहाला परांजपेसोबत लग्न करण्याचा सल्ला देतो. मात्र यशच्या या सल्ल्यावर नेहा नाराज झालेली पाहायला मिळते. आजच्या भागात यश परीला तिचा शाळेतला प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करणार आहे. परीला प्रोजेक्टमध्ये पॅलेस बनवायचा आहे परंतु तिच्या आईला वेळ नसल्याने ती यशला मदतीसाठी बोलावते.

त्यावेळी यश परीला आणखी एका खास मित्राची ओळख करून देणार असल्याचे तिला फोनवर सांगतो. ह्यावेळी यश परंजपेला सोबत घेऊन परीच्या घरी जाणार आहे आणि तिचा प्रोजेक्ट बनवणार आहे. आपला तयार झालेला पॅलेस पाहून परी खूप खुश होते. ह्या पॅलेसमध्ये परी, तिची आई आणि किंग एकत्र राहणार असे परी म्हणते त्यावेळी परी किंग म्हणून फ्रेंड म्हणजेच यशला उद्देशून बोललेली असते त्यावेळी परी परांजपेचा पूर्णपणे पचका करते. जवळच असलेल्या परांजपेला किंग म्हणून आपण असावे असे वाटत असते मात्र आपला पचका झाल्याचे लक्षात येताच परांजपे नाराज होतो. पण तिकडे मात्र यश आपल्या सोबत राहावा अशी परीची ईच्छा नेहालाही आवडेल का आणि परीच्या बोलण्याचा नेहाने लवकरात लवकर विचार करावा अशीच प्रेक्षकांची देखील ईच्छा आहे. मात्र ही ईच्छा पूर्ण होण्यासाठी अजून काही अवकाश असणार आहे. कारण परांजपे हा व्यक्ती खऱ्या आयुष्यात कसा आहे आणि किती स्वार्थी आहे ह्याचा उलगडा होण्यास अजून बराच वेळ जाणार आहे. परांजपेचे सत्य लवकरात लवकर सगळ्यांना समजावे यासाठी समीर देखील काही मदत करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तूर्तास परी आईच्या अडचणी दूर व्हाव्यात तिची संकटं दूर व्हावीत म्हणून निर्जळी उपवास करणार आहे. आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये परी काकूंना निर्जळी उपवास म्हणजे काय? हे विचारत असते. याबाबत काकू तिला निर्जळी उपवसाबद्दल माहिती सांगतात. त्यानंतर बिल्डिंगच्या आवारात परी इतर मुलांसोबत खेळात असते. दिवसभर अन्न आणि पाण्याशिवाय राहिलेली परी मात्र खेळता खेळता तेथेच चक्कर येऊन पडताना दिसणार आहे. आजूबाजूच्या बायका परीला चक्कर आलेली पाहून गोळा होतात. आईला मदत करताना परी स्वतःचाच जीव धोक्यात घालताना दिसत आहे. परीचा हा निरागसपणा मायराने तिच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलाच वठवला आहे मात्र ती आता आणखी अडचणीत सापडताना पाहायला मिळणार आहे. परी या संकटातून सुखरूप बाहेर पडावी त्यासाठी यश आणि नेहा काय काय प्रयत्न करणार आहेत हे आजच्या भागात प्रेक्षकाना पाहायला मिळेल.