
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहाची लव्हस्टोरी रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. नुकतेच सनशाईन गार्डनमध्ये यश आणि नेहाची भेट झालेली असते. इथे मात्र व्हॅलेन्टाईन डे असल्याने गार्डनमध्ये अनेक जोडपी बसलेली पाहायला मिळतात ते पाहून हे दोघेही अनकंफरटेबल होतात. आजच्या भागात नेहा ऑफिसमध्ये जाताना यशने पाडव्याच्या दिवशी गिफ्ट केलेला ड्रेस घालून जाते. मात्र नेहाच्या ड्रेसकडे यश पूर्णपणे दुर्लक्ष करतो . यशचे आपल्याकडे लक्ष्य नसल्याचे पाहून नेहा देखील नाराज होते. पण समीर यशला त्या ड्रेसची आठवण करून देताना दिसतो. त्यावेळी यश त्याच्या मोबाईलमध्ये असलेला नेहाचा फोटो समीरला दाखवतो आणि माझं नेहाकडे पूर्ण लक्ष्य होतं हे सांगतो. मालिकेत लवकरच एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. जी नेहा आणि यशच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करताना दिसणार आहे.

‘हाय हनी ..’ असे म्हणत यशला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये एक फॉरेनर येते आणि ती त्याला मिठी मारते. या फॉरेनची एन्ट्री झाल्याने नेहा मात्र गोंधळून जाते. या नव्या पात्राच्या एंट्रीमुळे नेहा यशपासून दुरावणार का? हे येत्या भागातच स्पष्ट होणार आहे. अर्थात यामागे देखील यशचाच काही प्लॅन असणार असा अंदाज प्रेक्षकांना वाटत आहे. नेहाला आपल्या अधिक जवळ आणण्यासाठी यश अशा युक्त्या करू शकतो असा विश्वास प्रेक्षकांना आहे. त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट नेमका काय आहे हे उद्याच्या भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र या पात्राच्या एंट्रीमुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढलेली पाहायला मिळत आहे. यश आणि नेहाचं लग्न व्हावं या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक ट्विस्ट पुढील काही भागात पाहायला मिळणार आहे. कारण नेहाला एक मुलगी आहे हे अजून आजोबांना समजलेले नाही. त्यामुळे आजोबा नेहाला आणि परीला स्वीकारतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. याअगोदर मिथिला काकूने यशच्या लग्नासाठी एक स्थळ सुचवले होते. मात्र ती घटस्फोटित आहे आणि तिला एक मुलगाही आहे हे समजल्यावर आजोबांनी तिला यश सोबत लग्न करण्यासाठी नकार दिला होता आणि याचा जाब त्यांनी सिम्मी काकूंना देखील विचारला होता. त्यामुळे अजून काही दिवस तरी प्रेक्षकांना नेहा आणि यशच्या लग्नाच्या क्षणाची वाट पाहावी लागणार आहे.

पण सर्वानाच प्रश्न पडला आहे कि हि फॉरेनर अभिनेत्री आहे तरी कोण जी ह्या मालिकेत प्रथमच पाहायला मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत जेसिका नावाचे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे “जेन कटारिया”. जेन कटारिया प्रथमच मराठी मालिकेत पाहायला मिळत आहे. यश आणि जेसिका हे पूर्वी पासून एकमेकांना ओळखत असल्याचे दाखवत आहेत. विशेष म्हणजे अजूनही मालिकेत नेहाच्या पतीची एन्ट्री झालेली नाही. परीचा खरा वडील कोण असा सवाल देखील प्रेक्षक खूप पूर्वीपासून उपस्तित करताना पाहायला मिळत आहेत. मालिकेतील ट्विस्ट वाढवण्यासाठी अजूनही या मालिकेत नेहाच्या पतीचा साधा फोटो देखील दाखवण्यात आलेला नाही. असो या फॉरेनर अभिनेत्रींमुळे मालिका पाहायला आणखीन उत्सुकता वाढणार हे नक्की पुढचे काही भाग तरी नेहा आणि यश यांच्यातील दुरावा वाढण्याची चिन्ह पाहायला मिळणार असच चित्र दिसतंय.