माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशला लग्नासाठी पाहायला आलेल्या अभिनेत्री नक्की आहे तरी कोण जाणून घ्या

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत यशने नेहापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु या विरहाने नेहा यशच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. लवकरच ती यशला आपल्या प्रेमाची कबुली देणार असल्याने मालिकेची उत्कंठा अधिक वाढली आहे. तूर्तास यशचे लग्न जुळावे यासाठी यशच्या काकूने एक स्थळ सुचवलेले पाहायला मिळाले. मालिकेत ‘सुनयना केरकर’ चे नवे पात्र दर्शवण्यात आले होते. परंतु सुनयना घटस्फोटीत आहे आणि तिला एक मुलगाही आहे हे पाहून तसेच तिची लग्नासाठीची विचित्र अट पाहूनच आजोबांनी तिला नकार देण्याचे ठरवले.

ही बिनधास्त सूनयना साकारली आहे अभिनेत्री “धनश्री भालेकर” या अभिनेत्रीने. धनश्री भालेकर ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत धनश्रीला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. याअगोदर धनश्रीने झी मराठीवरील दिल दोस्ती दोबारा या मालिकेतून अभिनय साकारला होता. कॉलेजमध्ये असतानाच धनश्रीला अभिनयाची ओढ लागली होती. जे आहे ते आहे, सर्किट हाऊस अशा नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर धनश्रीने मलेशियन पाम ऑइल कौन्सिल इंडिया येथे समन्वयक म्हणून काम केले होते. धनश्री भालेकर मुंबईतच लहानाची मोठी झाली. मुंबई युनिव्हर्सिटीमधून बिजनेस कॉमर्समधून मास्टर्सची डिग्री तिने प्राप्त केली आहे. ‘मायावी’ या चित्रपटातून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’, सोनी टीव्हीवरील ‘मेरे साईं’, सोनी मराठीवरील ‘क्रिमीनल्स’, सब टीव्ही वरील ‘ त्रिदेवियाँ’, झी युवा वरील ‘शौर्य’ अशा हिंदी मराठी मालिकेतून धनश्रीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

चितळे श्रीखंड आणि टिजेएसबीच्या व्यवसायिक जाहिरातीत देखील ती झळकली आहे. ‘हम गया नहीं, जिंदा है’ हा चित्रपट तिने साकारला याशिवाय धनश्रीला लिखाणाची आवड आहे ‘द वॉकर’ या चित्रपटात धनश्रीने लेखन ,दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिहेरी भूमिका निभावल्या आहेत. मेरे साईं या हिंदी मालिकेतून तिने कावेरीची भूमिका आपल्या अभिनयाने गाजवली होती. नुकतेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली. मालिकेत सूनयनाचा बिनधास्तपणा धनश्रीने तिच्या अभिनयातून उत्तम साकारलेला पाहायला मिळाला. पुढे जाऊन मराठी मालिकांमधून धनश्रीला मुख्य भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल तसेच येणाऱ्या काही मालिकांतही तिला काम मिळत राहीलच अशी आशा आहे. अभिनेत्री धनश्री भालेकर हिला तिच्या अभिनय क्षेत्रातील या यशस्वी प्रवासासाठी मनःपुर्वक शुभेच्छा…