Breaking News
Home / जरा हटके / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोट्या परीच्या कुटुंबात पसरली शोककळा परीच्या आईने लिहली भावनिक पोस्ट

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोट्या परीच्या कुटुंबात पसरली शोककळा परीच्या आईने लिहली भावनिक पोस्ट

माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. परी म्हणून ओळखली जाणाऱ्या मायराच्या आजोबांचे निधन झाले आहे. त्यांच्यासोबतचा एक छानसा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यात ती त्यांच्या आठवणीत रमलेली पाहायला मिळते आहे. मायराची आई म्हणजेच श्वेता वायकुळ यांनी त्यांच्या गोड आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात परीची आई श्वेता वायकुळ यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की ” पप्पा तुमच्यामुळे मला ही दुनिया कळली. तुमच्यामुळे मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली.

mayra vaykul grandfather
mayra vaykul grandfather

कधीही सोडली नाही तुम्ही माझी साथ का सोडून गेलात आज, तुम्हीच होता माझ्या जीवनाचा आधार. मायराचे कौतुक जेव्हा तुमच्या डोळ्यात दिसले तेव्हा खूप प्रसन्न वाटले मला. का थांबला नाहीत तिचं अजून कौतुक करायला. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे, माझ्या जगण्याला अर्थ आहे केवळ तुमच्यामुळे, माहिती नाही तुमच्याशिवाय मी पुढचं आयुष्य कसं जगेल, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कॉल करून विचारायची प्रत्येक सुखात तुम्ही माझ्या सोबत होता. तुमच्या शिवाय कास सामोरे जाऊ प्रत्येक गोष्टीला काहीच काळात नाही, कोण येईल माझ्या एका कॉल वर मला भेटायला खूप खूप आठवण येते पपा का गेलात तुम्ही? तुमच्या शिवाय जगायची सवय नाही हो मला. अचानक निघून गेलात बराच काही बोलायचं राहून गेलं स्वतःची काळजी न करता इतरांसाठी जगात राहिलात नेहमी सकारात्मक आमी प्रसन्न असायचा तुम्ही आणि तेच आम्हाला हि शिकवला. तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माझ्या प्रत्येक कामात विचारात स्वासात तुम्ही आहेत. माहित आहे तुम्ही परत नाही येनारपण माझ्या प्रत्येक गोष्टीत माझे बाबा आहेत. तुमचा प्रत्येक गुण माझ्या मायरा मध्ये आहे आणि त्याचा खूप अभिमान आहे मला.

shweta vaykul with father
shweta vaykul with father

आम्हाला कसलीच कधी कमी पडू दिली नाही तुम्ही. १५ दिवस कसे काढले तुमच्या शिवाय कस सांगू तुम्हाला.. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते Papa….Miss You Papa Forever. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे परी म्हणजेच मायर घराघरात पोहचली पण त्या आधी देखील तिच्या यु ट्यूब चायनलमुळे ती सर्वपरिचित होतीच. आता ह्या मालिकेतून तिच्या अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच सोशिअल मीडिया अकाउंट देखील तिची आईच सांभाळत असताना पाहायला मिळते. फारच कमी दिवसात मायराला खूप प्रसिद्धी मिळाली ह्यात तिच्या घरच्यांनी तिच्यातील खास गोष्ट जाणून घेतली त्यामुळेच तिला आज यश मिळालेले पाहायला मिळते. असो मायरा आणि तिच्या कुटुंबावर आलेल्या ह्या वाईट प्रसंगातून सर्व कुटुंब लवकर सावरून पुन्हा सर्व काही सुरळीत होईल अशी आशा आहे. परीच्या म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या आजोबाना भावपूर्ण श्रद्धांजली.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *