मराठीतील छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या अनेक अभिनेत्री हिंदी मालिकेत संधी मिळावी अशी स्वप्न पाहत असतात. मात्र स्वाती पानसरे यांनी मराठी मालिकांमधील खरे विषय दमदार यंत्रणा आणि खऱ्या यशाचं गुपित ओळखत मराठी मालिकेत पदार्पण केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्यांनी अभिनय साकारत मराठी मालिकेत आपला ठसा उमठवला आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल कि यापूर्वी देखील त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच नाटकांत कामे केली आहेत. पण माझी तुझी रेशीमगाठ ह्या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली असे म्हणायला हरकत नाही.

अभिनेत्री स्वाती पानसरे यांनी आजवर हिंदी मालिकांमध्ये बहुदा आई, काकी, सासू अशा छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. कसौटी जिंदगी की, ये जादू है जिन का, इशकबाझ, मेरी आवाज ही पहचान है, क्राईम पेट्रोल, क्राईम अलर्ट, बालवीर, नमः, एक हसीना थी अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच आता त्या मराठी मालिका गाजवण्यास देखील सज्ज झाल्या आहेत. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून सध्या त्या रसिक प्रेक्षकांच्या सेवेत आहेत. या मालिकेत त्या मिथिला हे पात्र साकारत आहेत. मिथिला हे पात्र खरोखरच आव्हानात्मक आहे. कारण यामध्ये थोडा भोळेपणा, साधेपणा, विनोदीवृत्ती आणि भावुक अशा वेगवेगळ्या छटा आहे. मात्र अभिनेत्री स्वाती पानसरे यांनी या पात्राला पूर्ण पने न्याय दिल्याचं दिसतं आहे. मालिकेतील सर्वच कलाकार दिग्गज असले तरी आपल्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिलेला पाहायला मिळतो. मिथिला पात्राला आपल्या कलेने त्यांनी वेगळा रंग भरत आपलं वेगळपण दाखवत मालिकेत वेगळी छटा निर्माण केली आहे.

अभिनेत्री स्वाती पानसरे यांनी मालिकांसह आजवर एकूण १३ मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. भरत जाधव बरोबर त्या आप्पा आणि बाप्पा या चित्रपटात दमदार अभिनय करताना दिसल्या. या चित्रपटात त्यांनी सुबोध भावे बरोबर देखील स्क्रिन शेअर केली. तसेच माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटात त्या अनिकेत विश्वासराव आणि भारत गणेशपुरे बरोबर अभिनय करताना दिसल्या. काळीच्या लग्नाला यायचं हं! यामधे देखील त्यांनी स्मिता तांबे बरोबर काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी तनिष्क, डॉय सोप, डिलाईट नट्स, केसरी टूर्स, HDFC होम लोन अशा अनेक जाहिराती देखील केल्या आहेत. सध्या त्यांची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका खूप चर्चेचा विषय असते. आज या मालिकेचे १०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. अशात मलिकेलतील सर्वच पात्र रुपेरी पडद्यावर पुरती धमाल करत आहेत. अभिनेत्री स्वाती पानसरे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…