जरा हटके

“माझी तुझी रेशीमगाठ” नव्या मालिकेत ह्या लहान मुलीचा दिलखुलास डान्स तुम्ही पहिला का

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरु होऊन आता जवळपास ३ आठवडे झाले इतक्या कमी वेळात मालिकेला भरभरून यश मिळालेलं पाहायला मिळतंय. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतात. अभनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे ह्यांनी ह्या मालिकेत प्रमुख भुमीका साकारल्यात तर संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी ह्यांच्यामुळे मालिकेला नवा रंग चढताना पाहायला मिळतो. पण सर्वांचे लक्ष वेधले आहे ते ह्या मालिकेतील छोट्या परीने. मालिकेतील नेहाची मुलगी परी हीच खर नाव “मायरा वायकुळ” असे आहे.

mazi tuzi reshimgath pari
mazi tuzi reshimgath pari

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणं, मुरडणं , रुसणं पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरंतर मालिकेच्या प्रोमोपासूनच तिला सर्वांची पसंती मिळताना दिसली. पण अनेकांना हे माहित नसेल कि ह्या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनल देखील पाहायला मिळतात. मायरा आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपल्या मुलीत काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि काही दिवसातच तिला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर देखील अभिनेत्यांना तिच्यासोबत व्हिडिओ काढायचा मोह होतो.

mayra waykul dance
mayra waykul dance

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री प्रार्थना बेहरे असो वा अभिनेता श्रेयस तळपदे सर्वच मंडळी तिच्यासोबत व्हिडिओ आणि फोटो काढायला उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी तिने अशी हि बनवा बनवी चित्रपटातील हृदयी वसंत फुलताना ह्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला. ह्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. व्हिडिओमध्ये छोटी मायरा डान्समध्ये देखील किती निपुण आहे हे लक्षात येते. गाण्यावर ठेका त्यातील हावभाव ती उत्तमरीत्या करताना पाहायला मिळते. तुम्हालाही तिचा हा डान्सचा व्हिडिओ नक्कीच आवडेल ह्यात शंका नाही. झी मराठीच्या माझी तुझी रेशिमगाठ मालिकेमुळे मायराला आणखी प्रसिद्धी मिळाली एक मोठा प्लॅटफॉर्म तिला मिळाला आणि त्याच तिने सोन करून दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. मायराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळा खूप खूप मोठी हो… चला पाहुयात तिचा हा डान्स विडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button