Breaking News
Home / जरा हटके / आपली बहीण परी हरवली असल्याचा तो एपिसोड पाहून मायराचा भाऊ लागला रडू भावा बहीणाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आपली बहीण परी हरवली असल्याचा तो एपिसोड पाहून मायराचा भाऊ लागला रडू भावा बहीणाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत २ दिवसापूर्वीच्या भागात परी आणि काकांना परांजपे वकील वेगळं करतो आणि काकांना त्यांच्या घरी घेऊन येतो. तर इकडे परांजपेंच्या सांगण्यावरून त्याचाच माणूस परीला घेऊन तिला घरी नेण्याचं नाटक करतो. शिवाय परांजपे वकील काकांना त्यांच्या घरी नेऊन परी हरवली म्हणून नेहाला फोने करून सांगतो इतकंच नाही तर नेहा रडत रडत घरी येते तेंव्हा मी परीला घरी आणल्याशिवाय इथे येणार नाही काही करून मी परीला आणणारच असं वाचन देखील देतो. हा हळवा सीन प्रेक्षकांच्या मनाला चांगलाच चटका देऊन गेला आहे. इतकंच नाही तरी परी म्हणजेच मायर हिच्या घरी देखील तो भावुक क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपला आहे.

mazi tuzi reshimgath mayra
mazi tuzi reshimgath mayra

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील छोटी परी मालिकेत येण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. World Of Myra and Family ह्या नावाने असलेल्या तिच्या युट्यूब चायनलला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत आपली पसंती दर्शवली आहे. इतकेच नाही तर माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका आम्ही परीमुळेच पाहतो असं अनेकांचं मत आहे. नुकताच ह्या मालिकेतील परीचा तो हरवलेला सीन पाहून तिचा लहान भाऊ “रियू” भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यात बहिणी बद्दलच ते प्रेम पाहायला मिळालं. मालिकेत आपली बहीण हरवली हे खोटं असलं तरी त्या लहान मुलाला हे खर्च वाटलं असावं. त्यामुळे परी म्हणजेच मायराने आपल्या लहान भावाची समजूत काढत त्याला घट्ट मिठी मारत त्याचे डोळे पुसत असल्याचा हलवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय. मायराची आई आणि वडील तिचे हे अकाउंट चालवत असून प्रेक्षक तिच्या व्हिडिओला पसंती दर्शवत आहे. भाव बहिणीच्या व्हिडिओला त्यांनी “फुलोंक तारोंका सबका केहना हे एक हजारोमे मेरी भान हे” हे गाणं जोडलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहताना आणखीनच भावुक होत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. असो परीला म्हणजेच छोट्या मायराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *