माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नेहा आणि यश यांची आगळी वेगळी प्रेम कहाणी ह्या मालिकेतून पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच पात्र उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतात हेच ह्या मालिकेच्या यशा मागचं कारण असल्याचं दिसून येत. मालिकेत मला ५०० कोटीवाला नवरा हवाय म्हणणारी शेफालीला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. खरतर या मालिकेआधी तिने डॉक्टर डॉन ह्या मालिकेत देखील आपल्या अभिनयाची उत्तम झलक दाखवली होती. माझी तुझी रेशीम गाठ मधील शेफाली साकारणारी अभिनेत्री काजल काटे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हो पण यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण हे तिचा अभिनय नसून तिच्या आयुष्यातीलच काही भयानक आणि काही मजेशीर प्रसंग आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या जीवनावर आधारित अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अशात यामध्ये तिच्या आयुष्यातील सायकलीचा प्रसंग फारच भयानक होता असं ती म्हणते. झालं असं काजल ७ वीमध्ये असताना ती शाळेत जाण्यासाठी सायकलने प्रवास करायची. तर एक दिवस तिच्याकडे असलेल्या सायकलीच्या बकेटमध्ये एका मुलाने एक प्रेम पत्र आणि काही फुलं ठेवून तिला प्रपोज केलं होतं. काजलला तो मुलगा काही आवडत नव्हता. कारण तो एक गुंड होता. त्यामुळे तिने ती फुलं आणि प्रेम पत्र फाडल आणि तिथेच टाकून ती निघून घेली. आता हा सर्व प्रकार त्या मुलाने पाहिला आणि त्याला नकार दर्शवल्यामुळे काजलला आता धडा शिकवयचा असं त्याने ठरवलं. त्याने एका मुलाला सांगून तिच्या सायकलचा अपघात घडवून आणला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच सिरीयस झालं होत असं काजल म्हणाली. तसेच या विषयी सांगताना पुढे ती म्हणाली की, “हे असे प्रसंग बऱ्याच मुलींबरोबर घडत असतात.”

त्यानंतर तिच्या सायकलीच्या आठवणींशी संबंधित तिने आणखीन एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणली की, “माझ्या नवऱ्याने मला एक सायकल गिफ्ट केली आहे. माझं वजन कमी व्हावं म्हणून त्याने मला ही सायकल दिली. पण खरं तर ती सायकल घेऊन आता ३ वर्षे झाली आहेत. पण आता पर्यंत फक्त ३० दिवस मी ती सायकल चालवली आहे.” पण आता मात्र तिला आपलं वजन मुळीच कमी करायचं नाहीये. तिला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी आहे तसाच राहायला सांगितलं आहे. पण मालिका संपल्यावर मी पुन्हा वजन कमी विचार कारेन असं देखील ती म्हणते. मित्रानो काजल काटे हीचा पती प्रतीक कदम ह्याच्या बद्दल अनेकांना काही खास गोष्टी माहित नसतील. मुंबई इंडियन्स ह्या आयपीएल सामन्यातील टीमचा तो एक महत्वाचा भाग आहे. प्रतीक गेली कित्तेक वर्ष मुंबई इंडियन्स टीमला फिटनेसचे प्रशिक्षण देतोय. त्यामुळे काजल हिला अनेकजण पती फिटनेस ट्रेनर असून तू फिटनेसकडे लक्ष का देत नाहीस असं विचारताना पाहायला मिळतात.