Breaking News
Home / जरा हटके / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक तब्बल २२ हजारांना घातला गंडा

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक तब्बल २२ हजारांना घातला गंडा

नुकतेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सूनयना केरकर हे पात्र दाखल झाले होते. यशसोबत लग्नाची बोलणी करायला ही सूनयना तिच्या आई वडिलांसोबत दाखल झाली होती. सूनयनाचे पात्र मालिकेत एकाच एपिसोडसाठी दाखल झाले होते त्यामुळे हे पात्र साकारणारी नायिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. हे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने निभावले होते. धनश्रीने याअगोदर हिंदी आणि मराठी मालिका अभिनित केल्या आहेत. मात्र नुकताच एक फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केलेला पाहायला मिळतो आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एका वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी धनश्रीला विचारण्यात आले होते. बालाजी टेलिफिल्म्सकडून तिला ही ऑफर आली होती.

actress dhanashri bhalekar
actress dhanashri bhalekar

कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून तिला यासंदर्भात सिलेक्शन झाले असा मेल आला होता. तिच्याबाबतची माहिती टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून मिळाली असे तिला सांगण्यात आले. बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला. मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे शूटिंग होणार आणि ते झी 5 वर दिसणार असे तिला सांगण्यात आले होते. त्यासाठी डॉक्युमेंटस पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे सांगितले. परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने ह्याची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी २०’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे तिला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले. इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला. त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून २२ हजार ३४८ रुपये एवढी विमानाच्या तिकीटाची रक्कम गुगलपे करण्यास सांगितली.९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल तिला आला. मात्र ह्या प्रोसेस मध्ये काही वेळ जाईल असे तिला सांगण्यात आले. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताची फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली होती. आधल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत तिने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असल्याचे तिला वाटले.

dhanashri bhalekar actress
dhanashri bhalekar actress

ज्या व्यक्तीने तिचे नाव वेबसिरीजसाठी सुचवले होते त्या अनिकेत कुमार चा देखील कुठलाच रिप्लाय तिला मिळाला नाही. अनेक फोन केले मेसेजेस केले पण कुठलाच रिप्लाय तिला आला नसल्याने शेवटी पोलिसांकडे तक्रार करेन असे सांगितल्यावर त्यांनी केवळ ‘wait’ एवढाच रिप्लाय दिला. त्यामुळे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही? माझी फसवणूक झाली आहे की नाही?. असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाला. ही गोष्ट माझ्यासोबत घडली पण ती इतर कोणासोबत घडू नये म्हणून तिने ही माहिती शेअर करून कलाकारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धनश्रीने यासंदर्भात मुंबईतील बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती दिली आहे पण त्यांनी देखील हे नंबर आणि नावं ओळखीचे नसल्याचे सांगितले आहे. बालाजी टेलिफिल्म्स वाल्यांविरोधात माझी कुठलीही तक्रार नाही पण ऑफिशियल डोमेन कोणीही बनवू शकतं का? हा प्रश्न मला आहे त्यामुळे हे नंबर मी पोलिसांना देखील कळवले आहेत आणि त्या लोकां विरोधात तक्रार दाखल केली आहे असे स्पष्टीकरण धनश्रीने दिले आहे. या प्रकरणात धनश्रीची फसवणूक झाली असल्याने तिने इतर कलाकारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *