Breaking News
Home / जरा हटके / नेहा आणि यशला समजणार परांजपे वकिलांच सत्य माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शेवटी तो सीन आलाच

नेहा आणि यशला समजणार परांजपे वकिलांच सत्य माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शेवटी तो सीन आलाच

माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेत परांजपे आणि नेहाच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. नुकतेच परांजपे नेहाला लग्नाची खरेदी करण्यासाठी साड्यांच्या दुकानात घेऊन जातो. मात्र नेहाला कुठली साडी घ्यावी तेच नेमके सुचत नसते तेवढ्यात परी यशला व्हिडीओ कॉल करते आणि त्यात नेहा यशला कुठली साडी निवडू असे विचारते. शेवटी यशच्या मदतीने ती साडी निवडते मात्र तिथेही परांजपे पुन्हा एकदा आपलाच तोरा मिरवताना दिसतो. नेहासोबत लवकरात लवकर लग्न करून परांजपे तिच्या घरावर ताबा मिळवणार आहे.

actor shreyash talpade and prarthana
actor shreyash talpade and prarthana

परांजपेचा हा घाट यश कधी उधळून लावतो याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यात समीर यशला कशा पद्धतीने मदत करतो याचीही उत्सुकता निर्माण होते. या मालिकेत लवकरच परांजपे आणि नेहाच्या लग्नाचा ट्रॅक बदलणार आहे कारण यशने परांजपेची धुलाई केलेली पाहायला मिळत आहे. नेहा समोरच यश परांजपेच्या शर्टची कॉलर खेचून त्याची धुलाई करत आहे. मालिकेत अचानक बदललेला हा ट्रॅक मात्र कोणत्या कारणामुळे घडला असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थात परांजपेचे सत्य लवकरात लवकर यशला समजणार का अशी चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. परांजपे नेहा सोबत लवकरात लवकर लग्न करणार असल्यानेच त्याचे सत्य उघडकीस येणार असे गृहीत धरले जात आहे आणि त्याचमुळे या परांजपेला मारत आहे. एवढे दिवस नेहा आणि यशच्या नात्यात परांजपे आडकाठी बनून आला होता. नेहाच्या रोजच्या कामकाजात देखील तो जास्तच लुडबुड करताना दिसत होता. यशला परांजपे चे हे वागणे समजत होते पण तो केवळ नेहासाठी गप्प राहिला होता. मात्र लवकरच यशला परांजपेचा खरा चेहरा दिसणार आहे.

actress prarthana behere and shreyash talpade
actress prarthana behere and shreyash talpade

मालिकेत परांजपेची एन्ट्री प्रेक्षकांना मात्र मुळीच रुचली नव्हती. परांजपे नेहाचे घर बळकावू पाहतोय हे आता नेहाला देखील समजलेल पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता पुढे येणाऱ्या भागात नक्की काय पाहायला मिळणार हे पाहायची उत्सुकता निर्माण झाली आहे. यश आणि नेहा कधी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतील याचीच उत्सुकता जास्त पाहायला मिळाली होती. मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक ताणून धरली जाणार नाही असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मालिकेत लवकरात लवकर परांजपेची धुलाई पाहायला मिळणार याचा आनंद प्रेक्षकांना झाला आहे. सोशिअल मीडियावर यशाच्या हातून परांजपेंच्या धुलाईचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा आनंदाचा क्षण केंव्हा पाहायला मिळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *