सोशल मिडीयावर सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील कलाकार समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ही मालिका सोडत असल्याची बातमी व्हायरल होत आहे. अनेक दिवसांपासून हा अभिनेता मालिका सोडणार म्हणून अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. नुकतंच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याने एक व्हिडिओ शेअर करत ह्या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर आणि जय यांच्यातील मजामस्ती प्रेक्षकांना खूपच आवडू लागली होती आणि ह्यातच अश्या बातम्या आल्याने प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत ह्यावर आपलं मत मांडलं आहे त्यात तो म्हणतो ” ज्यांनी कोणी हे मला न विचारता, माझ्याशी काहीही न बोलता असं उगीच सांगितलं आहे कि मी हि मालिका सोडतोय. त्याच्यावर खलबतं झाली तर असं अजिबातच नाहीये. तुमचा माझ्यावरती आणि माझा तुमच्यावरती प्रेक्षकांवरती भयंकर विश्वास आहे. मी हि मालिका कधीच सोडणार नाही. आम्ही कलाकार कायम असा प्रयत्न करत असतो कि आम्हाला खूप काम कस मिळावं. आम्ही कलाकार आमच्या आयुष्यात खूप धावपळ करून काम मिळवतो मी नाटकही करणार मी मालिकाही करणार आणि मी कविता देखील करणार. २३ तारखेपासून नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु होत आहेत. त्यामुळे माझी धावपळ होणार आहे. पण मी मालिका कधीच सोडणार नाही असं म्हणत संकर्षणाने पुढे आपल्या कवितेच्या ४ ओळी देखील आपल्या चाहत्यांना सुनावल्या आहेत.” हे बोलून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याने ह्या विषयाला पूर्णविराम दिला आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला मालिकेच्या आणि नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..