Breaking News
Home / जरा हटके / संकर्षण कऱ्हाडेच्या जुळ्या मुलांचा फोटो पाहून नेटकरी करतायेत कौतुक

संकर्षण कऱ्हाडेच्या जुळ्या मुलांचा फोटो पाहून नेटकरी करतायेत कौतुक

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा जुळ्या मुलांचा बाप आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच २७ जून २०२१ रोजी त्याला कन्यारत्न आणि पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. आपली मुलं सहा महिन्यांची झाली यानिमित्ताने संकर्षणने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे (सर्वज्ञ : सर्व जाणनारा , ज्ञानी .. स्रग्वी : पवित्रं तुळस..) अशी आपल्या मुलांची नावं अर्थसाहित सांगून त्याने मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या अनोख्या नावाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक झालं होतं. २७ डिसेंबर रोजी संकर्षणने सर्वज्ञ आणि स्रग्वीसोबतचा एक क्युटसा फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

actor sankarshan karhade children
actor sankarshan karhade children

संकर्षण कऱ्हाडे अभिनित करत असलेली झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच यश स्वतःबद्दल खरं सांगून नेहाला प्रपोज देखील करणार आहे. मालिकेत नेहाच्या चाळीतले मुलं थर्टीफर्स्टची पार्टी आयोजित करत आहेत मात्र नेहाचं परांजपेसोबत लग्न मोडले म्हणून ही पार्टी करायची नाही असा निर्णय सगळ्यानी घेतला होता. तेवढ्यात नेहा सगळ्यांना आपण थर्टी फर्स्ट साजरं करतोय असे आवर्जून सांगते. त्यावेळी यशला ती आमंत्रण द्यायला फोन करते त्यावेळी सिम्मी काकी तो फोन उचलते. फोनवर यश असेल म्हणून नेहा यशला अरेतुरे करते तेव्हा यश म्हणजे यशवर्धन चौधरी आहे असे सिम्मी काकू नेहाला ठणकावून सांगते. त्यामुळे यश कंपनीचा मालक आहे हे नेहाला आता लवकरच समजणार आहे. या संकटात यशला समीरची साथ कशी मिळते याची उत्सुकता आहे. मालिकेतील समीर आणि यश या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मालिकेसोबतच संकर्षण कऱ्हाडे तू म्हणशील तसं ह्या नाटकाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त आहे हे नाटक सध्या प्रेक्षागृहात हाऊसफुल्ल गर्दी करताना दिसत आहे. झी मराठीवरील आणखी एक रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन संकर्षण निभावत आहे त्यामुळे तो सध्या तारेवरची कसरत करताना दिसत आहे. या व्यस्त शेड्युलमधून आपल्या चिमुरड्यांसोबतचे काही क्षण तो एन्जॉय करत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *