माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील कलाकाराने हटके स्टाईल मध्ये दिल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका ठरली आहे. मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या उत्तम अभिनयाने मालिकेत रंग भरताना पाहायला मिळतात. मालिकेतील समीरची भुमिका निभावणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा १२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला वाढदिवशी अनेकांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. संकर्षणचा लहान भाऊ हा सुद्धा एक उत्तम अभिनेता आणि अँकर आहे. अनेक मालिकांचं अँकरिंग त्याने केलेलं पाहायला मिळत. अभिनेता “अधोक्षज कऱ्हाडे” असं त्याच नाव. दोघांत खूप चांगलं बॉन्डिंग असलेलं पाहायला मिळत.

आज २५ नोव्हेंबर रोजी संकर्षणचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त संकर्षण कऱ्हाडे ह्याने त्याला त्याच्या हटक्या स्टाईलमध्ये सोशिअल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशिअल मीडियावर त्याने लहानपणीच एक फोटो शेअर करत त्याच्या बद्दलच्या भावना प्रकट केल्या आहेत. संकर्षण म्हणतो ” माझा छोटा भाऊ (वयाने ….) माझ्यापेक्षा खूपच समंजस (हे त्याचं म्हणनं आहे ) मला अत्यंत योग्यं सल्ले देणारा, माझी अनेक कामं मोठ्या मनानी करणारा.. (कारण , ती कामं मला जमतच नाहीत….) कमी बोलणारा .. पण कमी बोलुन मला खूप ऐकवणारा माझ्या पाठीवर जन्माला आलेला आणि माझ्या पाठीशी कायम असलेला “अधोक्षज” तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. खूप मोठा हो. खूप काम कर. लोकांना उच्चारायला अवघड वाटणारं तुझं नाव लिलया त्यांच्या ओठांवर यावं आणि ते कायम रहावं इतकं नाव कमव. दीर्घ , निरोगी आयुष्यं तुला मिळावं. हीच देवाला प्रार्थना …संकर्षण आता काही नवीन प्रोजेक्ट मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. तो एक अष्टपैलू कलाकार असून सगळं सहजपणे जुळवून घेताना पहायला मिळतो.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होत असलेल्या किचन कल्लाकार या कुकरी शोची धुरा सांभाळताना दिसणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने साकारलेली समीरची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीवर आता तो दोन मालिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान त्याने आम्ही सारे खवय्ये या शोची धुरा देखील समर्थपणे पेलली होती. संकर्षण प्रमाणे त्याचा धाकटा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा देखील झी मराठी वाहिनीवरील मालिकेत झळकताना दिसतो. घेतला वसा टाकू नको या मालिकेतून तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे. लहान पणापासूनच दोघांनाही अभिनयाची आवड होती दोघेही एकत्रित नाटकांमधून कामे करत होते . त्याचा हा प्रवास यशस्वी होवो असे म्हणत आपल्या भावाबद्दल संकर्षणने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.