Breaking News
Home / जरा हटके / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परांजपेची साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून कौतुक कराल

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परांजपेची साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून कौतुक कराल

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाची वहिनी मीनाक्षी तिच्या लग्नासाठी एक स्थळ सुचवते. नेहाला पाहायला आलेला परांजपे हा पेशाने वकील असून तो अनेकांना पैशाचा गंडा घालताना दिसत आहे. त्याच्या या फसवणुकीच्या जाळ्यात नेहा देखील अडकेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मालिकेत परांजपेची भूमिका साकारली आहे अभिनेता “चैतन्य चंद्रात्रे” याने. चैतन्य चंद्रात्रे या अभिनेत्याला बहुतेकांनी ओळखले असेल. ‘आभास हा’ या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेता चैतन्य चंद्रात्रे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

actor chaitanya chandratre
actor chaitanya chandratre

या मालिकेव्यतिरिक्त ‘रुंजी’, ‘एका पेक्षा एक’, ‘व्याप कुणाचा ताप कुणाला’, ‘कुलवधू’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘एक तारा’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘फ्रेंड्स’, ‘गुलमोहर’ अशा चित्रपट आणि मालिकेतून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. केएफसी सारख्या काही मोजक्या व्यावसायिक जाहिरातीतूनही त्याने मॉडेलिंग केले आहे. अभिनयाचा त्याचा हा प्रवास सुरु असताना व्यवसाय क्षेत्राकडे वळण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय त्याने घेतला. कौस्तुभ आठवले, कुमार गौरव आणि अभिषेक कुमार या मित्रांच्या मदतीने त्याने ‘ए बी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना केली. या स्टुडिओमधून ‘सुलतान’, ‘बाहुबली 2’, ‘वेलकम टू कराची’, ‘धूम 3’ या भारतीय चित्रपट तसेच ‘कुंगफू योगा’, ‘रेसिडेंट एव्हील’, ‘फास्ट अँड फ्युरिअस’ अशा परदेशी चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्टसचं काम त्यांनी केलं. नेटफ्लिक्स सारख्या नामांकित जाहिरातींच काम देखील या स्टुडिओमार्फत करण्यात आलं आहे. व्हिज्युअल इफेक्टस साठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. केवळ एका सेकंदाच्या कुठल्याही सीनमध्ये २४ ते २५ फ्रेम्स असतात. एखादा सिन यातून बदलायचा असेल तर त्याचे बारकावे लक्षात घेऊन, म्हणजे चित्रीकरणात कुठला भाग असावा कुठला नसावा, दिवसातला कोणता वेळ आहे त्यानुसार माणसांची, घराची, झाडांची सावली बदलणं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तसे बदल सीनमध्ये घडवून आणावे लागतात.

 chaitanya chandratre ab studio
chaitanya chandratre ab studio

म्हणजे केवळ २ सेकंदाचा सिन तयार होण्यासाठी एक संपूर्ण दिवस त्यांना मेहनत घ्यावी लागते हे यातलं कौशल्य म्हणावे लागेल. ही सर्व कला ज्यांच्याकडे आहे अशी जवळपास ५० मराठी मुलं त्यांच्या ए बी स्टुडिओत काम करत आहेत. काम किचकट असलं तरी या कामाचा उत्तम मोबदला त्यांना मिळतो. सध्या अनेक देश विदेशातील चित्रपटासाठी हे काम त्यांना मिळत असलं तरी येत्या काळात मोशन पिक्चर्स असोसिएशन फिल्म्स ऑफ अमेरिका ह्याचं सर्टिफिकेट त्यांना मिळवायचं आहे जेणेकरून अशा होतकरू मुलांना एकत्रित आणून ए बी स्टुडिओ भारतातील नंबर एकच व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ बनवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या व्यवसायातील या यशस्वी वाटचालीसाठी चैतन्य चित्रात्रे आणि त्यात सहभागी असलेल्या त्यांच्या मित्रांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *