
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नव्या मालिकेला पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळला आहे. यश आणि नेहा यांच्यात होणारी मैत्री आणि नेहाची मुलगी ‘परि’चा निरागसपणा देखील प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत शेफालीचे पात्र देखील ५०० करोडचा नवरा मिळवण्यासाठी परीला आवाहन करताना दिसते. परि जे काही म्हणते ते अगदी खरं होतं असा समज या मालिकेत दाखवला आहे. त्यामुळे ही शेफाली आपल्याला ५०० करोडचा नवरा मिळावा म्हणून परीच्या मागे लागलेली दिसत आहे. शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “काजल काटे”. काजल काटे मूळची नागपूरची. अभिनयाची आवड तिला कॉलेजमध्ये असल्या पासूनच होती. नागपूर येथे त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने ठीक ठिकाणी नाट्यपथकं आयोजित केली होती त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम त्यांनी केले होते. शिवाय विविध नाट्य स्पर्धेत देखील ती नेहमीच सहभागी होत असे. नाटकातून काम करत असताना झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिला अभिनयाची संधी मिळाली. झी युवा वरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत तिने मोगराची भूमिका बजावली. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून तिने आयेशा बेगम हे पात्र साकारले होते. काजल काटे २०१९ साली प्रतीक कदम सोबत विवाहबद्ध झाली. प्रतीक कदम हा फिटनेस ट्रेनर आहे. काजलची थोरली बहीण “स्नेहा काटे शेलार” ही देखील मराठी हिंदी मालिका अभिनेत्री आहे. स्नेहा काटे शेलार ही ‘स्नेहा अशोक मंगल’ या नावाने ओळखली जाते. सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून जिजाबाईची भूमिका साकारत आहे.

जिजाबाई ही रामजीची दुसरी पत्नी आहे. रंगभूमी पासून अभिनयाची सुरुवात केलेल्या स्नेहा अशोक मंगल हिने मराठी मालिकेतून देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गर्ल्स हॉस्टेल’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत तिने भागीरथीबाईंची भूमिका बजावली होती. प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, दुनियादारी फिल्मी ईश्टाइल यासारख्या कलाकृतीतून ती नेहमीच प्रेक्षकांसमोर आली आहे. स्नेहाने अभिनेता “ऋषिकेश शेलार” सोबत लग्नगाठ बांधली आहे.’ सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील दौलतची भूमिका ऋषिकेश शेलारने गाजवलेली पाहायला मिळते. दौलतचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे “ऋषिकेश शेलार”. ऋषिकेश शेलार हा मराठी मालिका ,चित्रपट आणि नाट्य अभिनेता म्हणून ओळखला जातो. ऋषिकेशने सावित्रीजोती, स्वराज्यजननी जिजामाता, छत्रीवाली, शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मी सदैव मंगलम या गाजलेल्या मालिका आणि नाटकातून अभिनय साकारला आहे. याशिवाय डॉ तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी त्याला मिळाली आहे. ऋषिकेश आणि स्नेहाने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत एकत्रित काम केले होते. स्नेहा आणि काजल यांचे वडील अशोक काटे हे पोलीस निरीक्षक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे को’-रोना’मुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनाअगोदर त्यांच्या पत्नीचे देखील याच आजारामुळे निधन झाले होते. अभिनेत्री काजल काटे हिला शेफालीच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…