माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला आता रंजक वळण आलं आहे. यशमुळे लवकरच परांजपेचं सत्य काय आहे हे उघडकीस येणार आहे. नेहा आणि परांजपेचं लग्न होणार म्हणून यश दुबईला जायला निघतो मात्र अर्ध्या प्रवासातच त्याला परिकडून बातमी समजते की तीचं घर विकत घ्यायला काही लोकं आली होती. आपलं घर वाचवायचं म्हणून ती यशला मदत करण्यासाठी विनंती करते. अर्थात त्यानंतर यश नेहाच्या घरी परततो आणि परांजपेचा हेतू काय असतो याचा खुलासा करतो. तो नेहासोबत लग्न करून तीचं घर बळकवणार असतो त्यादरम्यान हे सत्य समजताच नेहा परांजपेला याबाबत जाब विचारते.

तेव्हा परांजपे नेहाला खूप काही बोलून जातो एक मुलगी असलेल्या आणि नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईशी कोण लग्न करणार ? असे म्हणून तो नेहाचे मन दुखावतो. आपलं पितळ उघडं पडेल म्हणून परांजपे भर मंडपातून पळ काढतो त्याच्या मागोमाग यश देखील त्याची धुलाई करत थेट स्वीटूच्या चाळीत दाखल होतो…. मालिकेचे हे चित्रीकरण स्थळ येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत दाखवले आहे. स्वीटूचे कुटुंब ज्या चाळीत राहत असते तिथेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचेही चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर मालिका पाहणाऱ्याच्या नक्कीच लक्षात येईल. परांजपे आपला जीव वाचवून ज्या ठिकाणी पोहोचतो ते ठिकाण बहुतेक चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांनी पाहिले आहे. अगदी अग्गबाई सासूबाई, लाडाची लेक गं अशा अनेक मालिकेतून हे चित्रीकरण स्थळ प्रेक्षकांनी पाहिले आहे अर्थात हा सर्व फिल्मसिटीचा एक भाग असल्याने या परिसरात अनेक मराठी तसेच हिंदी मालिकेचेही चित्रीकरण करण्यात येत आहे.

गमतीचा भाग म्हणजे परांजपे आणि यशचा मारामारीचा सिन पाहून ते थेट स्वीटूच्या चाळीत जाऊन पोहोचले आहेत अशी एक गोड प्रतिक्रिया जाणत्या प्रेक्षकांनी दिली आहे. मालिकेत परांजपेची धुलाई कशी होते याची उत्सुकता तर आहेच मात्र त्यानंतर यश नेहाला आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याचीही उत्कंठा आहे. मालिकेत लवकरच आणखी एका व्यक्तीची खास एन्ट्री होणार आहे. नेहा चा भाऊ नेहाला फोनवरून मी लग्नाला येणार नसल्याचे कळवतो तेव्हा नेहाचा भाऊ मात्र मालिकेने अजून गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. नेहाच्या आयुष्यात तिच्या भावाची काय जबाबदारी असणार हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळेल. मालिकेत अजून काही नवीन पात्र नक्कीच पाहायला मिळणार आणि ते कोण असणार हे येत्या काही भागात स्पष्ठ होतीलच तूर्तास परांजपेची होणारी धुलाई आज मात्र प्रेक्षक आवर्जून पाहणार हे नक्की…