माझी तुझी रेशीमगाठ मालिका गती तिच्या पहिल्या प्रोमोपासून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली. पहिल्या प्रोमोपासून मालिकेतील छोटी परी म्हणजेच अभिनेत्री बालकलाकार मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अनेकांना हे माहित असेल कि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत येण्याआधीच मायरा युट्यूब च्या माध्यमामुळे सर्वपरिचित होतीच. तिचा निरागसपणा प्रेक्षांची मने जिंकून घेतो.मालिकेत स्क्रिप्ट वाचता येत नसली तरी देखील अगदी धडाधड वाक्य बोलणारी मायरा हिचा आज २२ जानेवारी रोजी वाढदिवस आहे.

तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील यशाचा मित्र संकर्षण कऱ्हाडे याने मायरा सोबतचे काही फोटो शेअर करत वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देत “बॉस काकांकडून परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हटलं आहे. मालिकेतील इतर कलाकार आणि सेटवरील मंडळींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडे याच्या पोस्टवर अनेक मालिका प्रेमींनी तिला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. सेटवर देखील मायरा सर्वांची आवडती आहे. मायरासोबत सर्वाना व्हिडिओ आणि फोटो काढायचा मोह आवरत नाही. सेटवरील प्रत्येक कलाकार त्याच्या सोशिअल मीडियावर नेहमीच परिसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना पाहायला मिळतात. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत.

युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहेतिच्या व्हिडिओना लाखो हिट्स मिळताच शिवाय खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन चाहते प्रोत्साहित देखील करतात मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. ह्या सर्वांच्या मेहनतीमुळे आणि मायराच्या निरागस स्माईलमुळे ती सर्वांची आवडती बालकलाकार बनली. झी अवॉर्ड शो मध्येदेखील नुकतंच तिला अवॉर्ड देऊन सन्मानित देखील केलं गेलय. असो बालकलाकार छोटी परी म्हणजेच मायरा वायकुल हिला वाढदिवसानिमित्त आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.. खूप खूप मोठी हो बाळा…