माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत नेहा लवकरच यशला आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. कारण यशचा ऍक्सीडंट होणार आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. यशचा ऍक्सीडंट झाल्याचे समजताच नेहा खूप घाबरून जाते आणि धावत पळत ती यशला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते आणि त्याला घट्ट मिठी मारते. त्यामुळे आता लवकरच यश आणि नेहाच्या प्रेम कहाणीचा ट्रॅक हळूहळू रुळावर यायला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे.

एकीकडे नेहा आणि यशच्या नात्याची जवळीक वाढत असताना दुसरीकडे मात्र परीने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतलेला दिसून येत आहे. अर्थात यश आणि नेहामधले सिन मालिकेत जास्त दाखवण्यात आले असल्याने बाकीच्या कलाकारांना तात्पुरती विश्रांती देण्यात आली आहे त्यानंतर मालिकेत पुन्हा बाकीचे कलाकार देखील सक्रिय होणार आहेत. त्यामुळे या फावल्या वेळात परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा आता तिच्या कुटुंबासोबत ट्रिप एन्जॉय करायला गेलेली आहे. मायरा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे खूप जास्त लोकप्रियता मिळवून गेली आहे तिच्या ह्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी पुण्यातील काही खास ठिकाणी मायराला आणि तिच्या कुटुंबाला आमंत्रित केले आहे त्यामुळे नुकतीच मायराने या ठिकाणांना सदिच्छा भेट दिली आहे. या ट्रिपसंदर्भातले व्हिडीओ तुम्हाला तिच्या युट्युब चॅनलवर पाहायला मिळतील.

पुण्यातील नामांकित हॉटेल्स आणि फार्महाऊसने मायराला आमंत्रण दिले होते या फार्महाऊस आणि हॉटेल्समध्ये मायरा आणि तिच्या कुटुंबाने ही दोन ते तीन दिवसांची ट्रिप खूपच एन्जॉय केली आहे. यात अवनी फार्महाऊसमध्ये पोपटी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मायराचे ट्रिपचे मजा मस्ती करतानाचे हे व्हिडीओ तिच्या चाहत्यांना देखील खूपच आवडले आहेत आणि अनेकांनी या ठिकाणांना भेट देणार असल्याचे आवर्जून सांगितले आहे. मायराने साजरी केलेली पोपटी पार्टी तर युट्युबवर अल्पावधीतच खुप प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. अवघ्या दोन तासातच तिच्या ह्या व्हिडिओला जवळपास ५० हजाराहून अधिक लोकांचे व्हीव्हज मिळाले आहेत.