माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता यश आणि नेहाची प्रेम कहाणी मालिकेतून खुलू लागली आहे. एकीकडे मालिकेतला ह्या रंजक घडामोडी अनुभवत असतानाच मालिकेतून चिमुरड्या परीने म्हणजेच सर्वांच्या लाडक्या मायराने मात्र काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. अर्थात मायराच्या आजोळी तिच्या मामाच्या लग्नाची लगबग सुरू झाली असल्यानेच या खास कारणासाठी तिने थेट नाशिक गाठलेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मायराने मालिकेतून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत कोकण ट्रिप एन्जॉय केली होती .

त्यानंतर आता ती मामाच्या लग्नाला नाशिकला पोहोचलेली पाहायला मिळते आहे. मायराची आई श्वेता थोरात वायकुळ या मूळच्या नाशिकच्या आहेत. योगेश मामाच्या लग्नासाठी मायरा आणि तिची फॅमिली नुकतीच नाशिकला दाखल झाली आहे. लग्नाच्या लगबगीत मायराने सुद्धा स्वतःसाठी खरेदी केली आहे. नुकताच तिच्या योगेश मामाच्या हळदीचा समारंभ पार पडला असून मायराने देखील हा सोहळा खूप एन्जॉय केलेला पाहायला मिळतो आहे. हळदी समारंभाचे काही खास फोटो तिने इन्स्टग्रामवरून शेअर केले आहेत. पारंपरिक पोषाखातला मायराचा लूक तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडला असून तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया तिला दिल्या आहेत. मायरा वायकुळ हिच्या नावाने युट्युबवर एक चॅनल आहे ज्यात ती नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करताना दिसते. आतापर्यंत तिच्या ह्या चॅनलला तीन लाखांहून अधिक जणांनी सबस्क्राईब केलं आहे. यात तिने शेअर केलेल्या व्हिडिओजला तिच्या चाहत्यांकडून अल्पावधीतच खूप चंगला प्रतिसाद मिळाला आहे. योगेश मामाच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण तिने आपल्या युट्युब चॅनलवर शेअर केले आहेत. मुंबईहून नाशिकचा प्रवास आणि त्यानंतर लग्नाची खरेदी या व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. आता योगेश मामाच्या लग्नातील मायराचा थाट कसा असणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

तूर्तास माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर काही दिवसातच मायरा पुन्हा मालिकेत सक्रिय होणार आहे. सध्या यश आणि नेहाची प्रेमकहाणी खुलु लागली असतानाच यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास परीने नकार दिला आहे. त्यामुळे यश परीची कशी समजूत काढतो याची जास्त उत्सुकता आहे. विशेष म्हणजे परीचा मालिकेतील खरा बाबा कोण आहे हेदेखील अजून स्पष्ट केले गेले नाहीये. काहीदिवसातच त्याचा चेहरा समोर येणार हे नक्की. सोशिअल मीडियावर देखील परिच्या बाबांची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. इतके दिवस झाले तरी अजून परीच्या बाबांची एन्ट्री तर सोडाच एखादा फोटो देखील दाखवला गेला नसल्याचं चाहते प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत. असो आपली लाडकी परी लवकरच मालिकेत पुन्हा पाहायला मिळो हीच सदिच्छा…