माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न झाल्यापासून त्यांच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे. सिम्मी काकूच्या सांगण्यावरून नेहाची वहिनी म्हणजेच मीनाक्षी तिच्या कामात ढवळाढवळ करताना दिसत आहे. नेहाच्या प्रत्येक कामात तिची वहिनी अडथळा ठरल्याने समीर मिनाक्षीवर चिडलेला असतो. यावरून तो शेफलीला तिच्यावर लक्ष्य ठेवायला सांगतो. अशातच आता मीनाक्षी सिम्मी काकूंची पोलखोल करताना पाहायला मिळत आहे. मिनाक्षीला या कामासाठी सिम्मी काकुंकडून पैसे मिळत असतात. ही गोष्ट ती आता नेहाला सांगणार आहे. त्यामुळे मालिकेचा हा बदललेला ट्रॅक पाहून प्रेक्षक भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहेत.

मालिका आता मूळ ट्रॅकवर आल्याने सिम्मी काकूंवर नेहा भडकलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच अविनाशची एन्ट्री करण्यात आली होती. अविनाशमुळे नेहा आणि यशच्या सुखी संसारात वादळ उठणार अशी चर्चा होती मात्र अजून पर्यंत तरी अविनाशने आपली ओळख लपवल्याने नेहाचा संसार सुरळीत सुरू आहे. मालिकेत अविनाशच्या कूरघोड्या सुरू होण्या अगोदरच सिम्मी काकूंचा डाव मिनाक्षीमुळे उधळलेला पाहायला मिळतो आहे. नेहाच्या प्रत्येक कामात अडथळा आणण्यासाठी सिम्मी काकू मिनाक्षीला पैसे देत होती. मात्र या सर्व गोष्टींचा जाब आता नेहा सिम्मी काकुला विचारणार आहे. ‘अशा कुरघोड्या करून माझ्या आणि यशमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील’ असे म्हणून नेहाने सिम्मी काकुला चक्क धमकी वजा इशाराच दिलेला पाहायला मिळतो आहे. मालिकेची ही बाजू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता नेहा इथून पुढे विचारपूर्वक निर्णय घेईल अशी अपेक्षा बाळगली आहे. मात्र नेहकडून अपमान झालेली सिम्मी काकू गप्प कशी राहील हे प्रेक्षकही चांगलेच जाणून आहेत.

त्यामुळे सिम्मी काकू अविनाशच्या मदतीने नेहाच्या विरोधात मोठे षडयंत्र रचणार हे येत्या काही भागांमध्येच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परंतु तूर्तास तरी सिम्मीचे कारस्थान नेहासमोर आल्याने ती तिच्यापासून दूर राहून सावध भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे. सिम्मी काकूंचा डाव यशला कधी समजणार याची अजून प्रतीक्षा असली तरी सिम्मी काकू नेहाच्या विरोधात लवकरच एक मोठा डाव राचणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मालिकेचा टीआरपी मधल्या काळात खूपच घसरला होता पण आता पुन्हा मालिका पाहण्यात प्रेक्षक रस घेताना पाहायला मिळत आहेत ट्रॅकमुळे प्रेक्षक खूष झालेले पाहायला मिळत आहेत. असो सिम्मी आणि नेहा ह्यांच्यात पुढे काय घडणार हे येत्या काही भागात पाहायला मिळेलच.