माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षीची’ एन्ट्री झाली आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न होण्यासाठी तिला स्थळं सुचवत आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असे स्पष्ट नकार देत वकिलाचे स्थळ नाकारते. मालिकेत नेहाची वहिनी मीनाक्षी काहीशा विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. अनेकांना हि अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न पडला असेल ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात …

नेहाची वहिनी म्हणजेच मिनाक्षीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “स्वाती देवल”. स्वाती देवल ही मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. फु बाई फु या शो मधून तिने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘चल धर पकड’, ‘आम्ही सातपुते’, ‘वन टू का 4’, ‘असा मी असामी’ ,’कुंकू’, ‘वादळवाट’, ‘पुढचं पाऊल’ अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून स्वातीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या सर्व कलाकृतीतून तिच्या वाट्याला नेहमीच विनोदी तसेच खलनायकी ढंगाच्या भूमिकाच आलेल्या दिसल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ती मात्र विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. नेहाची तिने परांजपे ह्या वकिलाची निवड करून त्याला नेहाच्या घरी लग्नाच्या बोलणीसाठी घेऊन आलेली पाहायला मिळाली. अर्थात नेहाचे लग्न होण्यासाठी ती पैसेही घेत असल्याचे दिसते त्यामुळे पुढे जाऊन हे पात्र नेहाच्या बाबतीत काय काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पण मालिकेत तिने दमदार एन्ट्री घेतलीय.

अभिनेत्री स्वाती देवल ही संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता “तुषार देवलची” पत्नी आहे. २६ ऑक्टोबर २००३ मध्ये त्यांनी लग्न केले होते. ‘स्वराध्य’ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. स्वराध्यला देखील तुषार प्रमाणे संगीताची आवड आहे. आतापासूनच तो त्याच्या वडिलांकडून संगीताचे धडे गिरवत आहे. तुषार देवल गेल्या कित्येक वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरून प्रेक्षकांसमोर आला आहे. या शो मधून अनेकदा त्याची खिल्ली देखील उडवताना दिसली पण हा त्या शो मधलाच एक भाग आहे सुरवातीला त्याने अनेकदा ह्याच मालिकेत अभिनय देखील साकारला होता पण आता मालिकेत अनेक कलाकार पाहायला मिळतात त्यामुळे ह्याच कारणामुळे कदाचित त्याचा अभिनय आपल्याला पाहायला मिळत नसावा. अनेक वर्षानंतर स्वाती देवल पुन्हा एकदा झी वाहिनीवर झळकताना दिसत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या नव्या मालिकेनिमित्त अभिनेत्री स्वाती देवल हिला शुभेच्छा आणि अभिनंदन….