माझा होशील ना मालिकेत आदित्य आणि सई भाड्याच्या घरात राहायला आले आहेत. त्यांनी घेतलेलं भाड्याच हे घर सिंधू मामींच असल्याने म्हणजेच त्या चाळीचा कारभार सिंधू मामी सांभाळत असल्याने आदित्य आणि सई त्यांच्या तावडीत सापडले आहेत. त्यामुळे मामी जसे म्हणतील तसे आदित्य आणि सईला त्या रूममध्ये राहावे लागत आहे. खरं तर सिंधू मामींची भूमिका विरोधी असल्याने दादा मामांवरील राग ती आदित्य आणि सईवर काढत आहे. माझा होशील ना मालिकेत सिंधू मामींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देशमुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

अभिनेत्री सीमा देशमुख या पूर्वाश्रमीच्या सीमा साठे. त्यांचे वडील जयंत साठे यांना भारतीय बनावटीच्या बाहुल्या बनवण्याचा छंद आहे. गणपतीच्या वेळेस घरगुती सजावटीसाठी त्यांनी बनवलेल्या या बाहुल्याना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांच्या या बहुरूपी बाहुल्यांची दखल प्रसारमाध्यमांनी देखील घेतली होती, हे विशेष. त्याहून इतके दिग्गज कलाकार असूनही आजही छंद जोपासणे सोपी गोष्ट नाही. सीमा देशमुख या नाट्य, चित्रपट आणि मालिका अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचयाच्या आहेत. तुझं तू माझं मी, टाइम प्लिज, निरोप, गोष्ट लग्नानंतरची, एक निर्णय, अंकुर, अश्रूंची झाली फुले, नांदी, एबी आणि सीडी, देवशप्पथ, मला काहीच प्रॉब्लेम नाही अशा अनेक दर्जेदार मालिका, चित्रपट, नाटक त्यांनी अभिनित केल्या आहेत. या सर्वातून विरोधी भूमिकाच बहुतेकदा त्यांच्या वाट्याला आलेल्या पाहायला मिळतात. एक उत्तम निवेदिका म्हणूनही त्यांनी अनेक मंचावरून विविध कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळली आहे.

तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीरंग देशमुख हे सीमा देशमुख यांचे पती. श्रीरंग देशमुख यांनी रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेतून कार्तिकच्या वडिलांची म्हणजेच ललित इनामदार यांची भूमिका साकारली आहे. पुढचं पाऊल या मालिकेतही ते झळकले होते यामालिकेतूनही ते अभिनेत्री हर्षदा खानविकरच्या पतीच्या भूमिकेत झळकले. गैर, सिटीझन, मोरया, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय! अशा चित्रपटातून ते प्रेक्षकांसमोर आले आहेत. “एक निर्णय” या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले होते. सीमा आणि श्रीरंग देशमुख यांना रोहन नावाचा मुलगा आहे. रोहन देशमुख हा मराठी सृष्टीर म्युजिक कंपोजर म्हणून ओळखला जातो. एक निर्णय या चित्रपटातील ५ गाण्यांपैकी एका गाण्याला रोहनने संगीतबद्ध केलं आहे. अभिनेत्री सीमा देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…