माझा होशील ना मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ३० ऑगस्ट पासून या मालिकेच्या जागी आता “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या नव्या मालिकेतून अमृता पवार आणि हार्दिक जोशी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुर्तास माझा होशील ना ही मालिका निरोप घेणार असल्याने मालिकेत नकली आदित्यला म्हणजेच मॉन्टीला आणि जेडीला लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

यासाठी सई, आदित्य आणि त्यांचे मामा हे आदित्य कंपनीला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात आता सईची मैत्रीण नयनादेखील महत्वाचे काम दिले आहे. त्यामुळे ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत मॉन्टीचे पात्र कोणी साकारले आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…मालिकेत नकली आदित्य बनून आलेल्या मॉन्टीचे खरे नाव आहे “सुजय हांडे”. सुजय हांडे हे निर्माते म्हणूनही मराठी सृष्टीत कार्यरत आहे. डि जी रुपारेल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. ‘ माझा होशील ना’ या मालिकेचे निर्माते म्हणून सुजय हांडे जबादारी सांभाळत आहे. Ocean फिल्म कंपनीत त्यांनी काम केले आहे. ‘टेल्स व ब्लाइंडनेस’ या चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. सुजय हांडे हे प्रसिद्ध गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक “अशोक हांडे” यांचा मुलगा आहे. अशोक हांडे यांनी ‘चौरंग’ ही संस्था निर्माण केली त्यातून ‘मंगल गाणी दंगल गाणी’, ‘मराठी बाणा’, ‘अमृत लता’, ‘मी यशवंत’, ‘मधुरबाला’, ‘आवाज की दुनिया’ ,’स्वर स्नेहल’ यासारखे कार्यक्रम सादर केले आहेत.

मराठी बाणा ह्या कार्यक्रमातून त्यांनी मराठी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हसत खेळत लोककलांचा ठेवा जतन करण्याचं काम त्यांनी या कार्यक्रमातून केलं आहे. मराठी संस्कृती मांडणाऱ्या या कार्यक्रमाचे दोन हजाराहून अधिक प्रयोग प्रेक्षकांनी हाऊसफुल केले. १९८७ साली त्यांनी ‘चौरंग’ या संस्थेची निर्मिती केली होती. आज या संस्थेला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुजय हांडे हा त्यांचा मुलगा या संस्थेत कार्यकारी निर्माता म्हणून काम सांभाळत आहे. सोबतच मराठी मालिका निर्मिती क्षेत्रात आणि आता अभिनेता बनून प्रेक्षकांसमोर आला आहे. पारुल देवल हांडे हे सुजयच्या पत्नीचे नाव पारुल हांडे ही कौसलिंग सायकॉलॉजिस्ट आणि आर्ट बेस्ड थेरपिस्ट आहे. माझा होशील ना मालिकेतील मॉन्टी म्हणजेच अभिनेता सुजय हांडे ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ….