आरोग्य

माझा होशील ना मालिकेत चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्रीची होणार एन्ट्री

माझा होशील ना मालिकेत सई आणि आदित्य दोघेही आदित्य ज्या कंपनीत कामाला असतो त्या ठिकाणी भेट द्यायला जात असतात. दादा मामांच्या म्हणण्यानुसार आपला नवरा कुठे कामाला जातो? हे त्याच्या बायकोला माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून दोघांमधील विश्वास अधिक घट्ट होण्यास मदत होते. त्यामुळे मालिकेत आजच्या भागात सई आणि आदित्य दोघेही कंपनीत गेलेले दिसतात. आजच्या भागात चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेत्री “स्नेहल शिदम” ची एन्ट्री माझा होशील ना या मालिकेतून होत आहे. कंपनीत आल्यावर सईचे औक्षण करतानाचा एक फोटो स्नेहल ने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे यासोबतच या मालिकेत मी एल छोटीशी भूमिकाही साकारत असल्याचे तिने सांगितले आहे.

snehal chidam actress
snehal chidam actress

स्नेहल ने चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या शोचे विजेतेपद पटकावले होते. या संधीमुळे स्नेहल चला हवा येऊ द्या च्या मांचाचा एक महत्वाचा भाग बनली आहे. आपल्या विनोदी अभिनयाने तिने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच आहे शिवाय काही गंभीर भूमिकांमधूनही तिला वेगवेगळ्या मालिकेतून अभिनयाची संधी मिळाली आहे. स्वीटी सातारकर या चित्रपटाच्या माध्यमातून स्नेहल मोठ्या पडद्यावर झळकली असून भागो मोहन प्यारे मालिकेतून तिने महत्वाची भूमिका साकारली होती. माझा होशील ना मालिकेत ती छोट्या भूमिकेत झळकताना दिसत असली तरी ही भूमिका तिच्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहलला वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासूनच नृत्याची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यावर कीर्ती कॉलेजमधून तिने अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. अनेक एकांकिकामधून सहभागी होऊन उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं इथे तिने पटकावली होती. चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या शोमध्ये पार्टीसिपेट करण्याचे तिने ठरवले त्यासाठी ऑडिशनही तिने दिली. आपल्या मराठी इंडस्ट्रीत खूप कमी महिला कलाकार अशा आहेत ज्या आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवतात त्यात आता स्नेहल शिदमने आपला पाय घट्ट रोवलेला पाहायला मिळतो आहे. माझा होशील ना मालिकेत स्नेहल एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे या भूमिकेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button